ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २३ - पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून काल रात्रीपासून पाकिस्ताने भारतीय चौक्यांवर केलेल्या गोळीबारात २ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत.
काल रात्री एक वाजल्यापासून पाकिस्ताने अरनिया व आरएस पुरा सेक्टरमधील २२ चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. यात दोन नागरिक मृत्यूमुखी पडले असून एका जवानासह पाच जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
या गोळीबारामुळे सीमेलगतच्या गावांमध्ये दहशतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात सीमेवरील 2 नागरिकांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारांसाठी जम्मू वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.