शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी घरांची शहरांमध्ये गरज

By admin | Updated: March 20, 2016 04:02 IST

भाड्याने घर देणे लवकरच नफ्याचा व्यवसाय बनणार आहे. देशाच्या शहरी भागांत सध्या २ कोटी घरांची गरज असून, आजच्या घडीला जवळपास १ कोटी १0 लाख घरे रिकामी पडून आहेत.

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीभाड्याने घर देणे लवकरच नफ्याचा व्यवसाय बनणार आहे. देशाच्या शहरी भागांत सध्या २ कोटी घरांची गरज असून, आजच्या घडीला जवळपास १ कोटी १0 लाख घरे रिकामी पडून आहेत. ही तफावत लक्षात घेता केंद्र सरकारने भाड्याने घर देण्याच्या व्यवसायाला उत्तेजन देण्याचे ठरवले आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयातर्फे लवकरच त्यासाठी नवे निवासी भाडेकरार धोरण (रेंटल हाउसिंग पॉलिसी) जाहीर होणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये घरांची कमतरता बऱ्यापैकी दूर होऊ शकेल.शहरीकरणामुळे जवळपास २ कोटी कुटुंबांना निवासी घरांची गरज असून, त्यात सतत भर पडते आहे. घरमालकांनी आपली रिकामी घरे, भाडे व्यवसायाच्या बाजारपेठेत आणावीत. सरकारतर्फे त्यासाठी घरमालकांना उत्तेजन देण्यात यावे, अशी शिफारस केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने केली होती. शहरांत २७ टक्के लोक भाड्याच्या घरात राहतात. त्यापैकी २५ टक्के भाडेकरू असे आहेत की त्यांच्यात व घरमालकात कायदेशीर करारनामेही नाहीत. तोंडी करारावरच सारा व्यवहार चालतो. भाडेकऱ्यांना संरक्षण देणारा भाडे नियंत्रण कायदा प्रत्येक राज्यात अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार घरमालकाला विशिष्ठ मर्यादेत घरभाडे घेता येते आणि ठराविक काळानंतर त्यात ठराविक मर्यादेत वाढ करता येते. गृहनिर्माण मंत्रालयाच्या मते, घरमालक याच कायद्याच्या भीतीने भाडेकरार करणे टाळतात अथवा आपली घरे रिकामी ठेवणे पसंत करतात.भाडेकरारासाठी मॉडेल कायदा आणणारनव्या भाडेकरार धोरणात भाडेकरारासाठी एक मॉडेल कायदा तयार करण्यात येत आहे. अधिकाधिक लोकांनी रीतसर भाडेकरार नोंदवावेत, घरमालकांना बाजारभावानुसार त्याचे वाजवी भाडे मिळावे आणि भाडेकरूंनाही संरक्षण मिळावे असा सरकारचा उद्देश आहे. लोकेशननुसार घराचे भाडे आणि ठराविक काळाने त्यातील वाढ नियमानुसार ठरेल. हा मॉडेल कायदा तमाम राज्य सरकारांनी स्वीकारावा, असा आग्रह केंद्र सरकार करणार आहे. केंद्राची भूमिका त्यात केवळ फॅसिलिटेटरची आहे.सध्या घर भाड्याने देण्याच्या व्यवहाराला व्यापारी व्यवहार मानले जाते आणि त्यावर दुप्पट अथवा तिप्पट घरपट्टी आकारली जाते. नव्या धोरणात भाड्याने घर देणाऱ्याला घरपट्टीत तसेच भाडेकराराच्या स्टँप ड्यूटी व नोंदणी फीमध्ये सूट देण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थात केंद्र सरकारच्या या प्रस्तावाशी राज्य सरकारे व जागोजागच्या नगरपालिका, महानगरपालिका कितपत सहमत होतील, याविषयी तूर्त शंका आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नाचा घरपट्टी हाच मुख्य स्रोत आहे.