शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

अश्रुधूर सेल फुटल्याने दोन पोलीस जखमी पोलीस कवायत मैदानावरील घटना : महानिरीक्षकांच्या दौर्‍यानिमित्त सुरू आहे प्रात्यक्षिक

By admin | Updated: March 5, 2016 23:49 IST

जळगाव: पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या प्रात्यक्षिका दरम्यान अश्रुधूर सेल फुटल्याने राहुल तोलाचंद नारेकर (वय २६) व संभाजी सरोदे (वय २३ ) दोन्ही रा.पोलीस मुख्यालय हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजता घडली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची लगेच सुटका करण्यात आली.

जळगाव: पोलीस कवायत मैदानावर सुरू असलेल्या प्रात्यक्षिका दरम्यान अश्रुधूर सेल फुटल्याने राहुल तोलाचंद नारेकर (वय २६) व संभाजी सरोदे (वय २३ ) दोन्ही रा.पोलीस मुख्यालय हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजता घडली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची लगेच सुटका करण्यात आली.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे हे ९ ते १२ या कालावधित पोलीस दलाच्या वार्षिक तपासणी निमित्त जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर दोन दिवसापासून पोलीस कवायत मैदानावर मॉक ड्रील, सेरेमोनियल यासह विविध प्रकारचे प्रात्यक्षिक सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी सरावादरम्यान एका कर्मचार्‍याने अश्रुधूर सेल फेकल्यानंतर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी लांब जाण्याऐवजी राहुल नारेकर त्याला पकडण्यात गेला. त्यावेळी सेलने टप्पा घेतल्यामुळे त्याचा स्फोट झाला. त्यातील वायु बाहेर आला. त्यात घसरुन पडल्यामुळे राहुल यांना हाताला खरचटले तर संभाजी सरोदे यांच्या डोळ्याजवळ दगड लागल्याने जखम झाली. या प्रकारामुळे प्रात्यक्षिक थांबविण्यात आले व दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
प्रात्यक्षिक घेणे ही नियमित प्रक्रीया आहे,अशा सरावामुळे किरकोळ खरचटण्याचे प्रकार घडतात. त्यात घातक असे कोणतेही द्रव्य नसते. आजचा हा प्रकार त्याचाच भाग असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी सांगितले.