शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर घुसखोरीचे दोन प्रयत्न उधळले

By admin | Updated: September 23, 2016 01:39 IST

पाकव्याप्त काश्मिरातून काश्मिरात घुसखोरी करण्याचे अतिरेक्यांचे दोन प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडले. उरी आणि नौगाम भागात घुसखोरीचे प्रकार हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे

श्रीनगर : पाकव्याप्त काश्मिरातून काश्मिरात घुसखोरी करण्याचे अतिरेक्यांचे दोन प्रयत्न सुरक्षा दलाने हाणून पाडले. उरी आणि नौगाम भागात घुसखोरीचे प्रकार हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नौगामच्या दोन वेगवेगळ्या भागांत घुसखोरीचे प्रयत्न उधळण्यात आले. या मोहिमेत दोन दिवसांत सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे. उरीतील मोहिमेत किमान आठ अतिरेकी मारले गेले असल्याचा दावा करण्यात येत आहे, पण अद्याप हे मृतदेह सापडलेले नाहीत. नियंत्रण रेषेजवळून घुसखोरी वाढल्याने सुरक्षा वाढविण्यात आली आहे. गुरुवारी दोन ठिकाणांहून घुसखोरीचा प्रयत्न झाला, पण सुरक्षा दलाने ही घुसखोरी रोखली.

पॅलेट गनवर बंदीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळलीहिंसक जमावाविरुद्ध बळाचा वापर क्रमप्राप्त असल्याचे सांगून, काश्मिरात निदर्शकांविरुद्ध ‘पॅलेट गन’ वापरण्यास बंदी घालण्याची मागणी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या उच्च न्यायालय वकील संघाच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हिंसक निदर्शकांवर पॅलेट गन चालविण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला चालविण्याची विनंती मान्य करण्यासही मुख्य न्यायाधीश एन. पॉल. वसंतकुमार आणि न्यायमूर्ती अली मोहंमद मार्गे यांच्या खंडपीठाने नकार दिला.

काश्मिरातील स्थिती व गृहमंत्रालयाने पॅलेट गनला पर्याय शोधण्यासाठी विशेष समितीची स्थापना केल्याच्या पार्श्वभूमीवर, तिला निर्णय घेण्यापूर्वी पॅलेट गनवर बंदी घालणे योग्य वाटत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.मदनलाल यांना श्रद्धांजली भारतीय सैन्याने गुरुवारी शहीद हवालदार मदनलाल (३७) यांना श्रद्धांजली अर्पण केली. उत्तर काश्मिरात नौगाम भागात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांशी दोन हात करताना हवालदार मदनलाल हे शहीद झाले. त्यांनी आपल्या तुकडीचे नेतृत्व केले होते. मंगळवारी सैन्याने नौगाम आणि उरी येथे घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला होता. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाने चकमकीत एका अतिरेक्याला ठार मारले. बांदीपोरातील अरगाम गावात अतिरेकी घुसल्याची माहिती मिळताच, सुरक्षा दलाने या भागाला घेरले. या वेळी या अतिरेक्याने गोळीबार सुरू केला. त्यानंतर, झालेल्या चकमकीत आतापर्यंत एक अतिरेकी मारला गेला आहे. या भागातून हत्यारेही जप्त करण्यात आली.