शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

'डीअर'वरून स्मृती इराणी-अशोक चौधरी यांच्यात ट्विट युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 20:55 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी व बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांच्यात ट्विटरवर 'डीअर' शब्दावरून चांगलेच वाकयुद्ध पेटले आहे.

ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. १४ - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी व बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांच्यात ट्विटरवर 'डीअर' शब्दावरून चांगलेच वाकयुद्ध पेटले आहे. अशोक चौधरी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना शिक्षणाच्या नवीन धोरणाबाबत एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी डीअर स्मृतीजी असे संबोधित केले होते. 
 
स्मृती इराणी यांनी या ट्विटमध्ये केलेल्या प्रश्नाचे उत्तर तर दिले नाही. परंतु त्यांनी त्यावर रिट्विट करून लिहिले की, अशोक चौधरी तुम्ही महिलांनाही डीअर म्हणून कधीपासून संबोधित करू लागला आहात. त्यानंतर दोघांमध्ये ट्विटरवरच तक्रारी सुरू झाल्या. स्मृती इराणींच्या या प्रत्युत्तरानंतरही अशोक चौधरींनी स्वतःची बाजू लावून धरली.  'अपमानाचा हेतू नाही, मात्र प्रोफेशनल इमेल्स हे डीअर या संबोधनानेच सुरू होतात. कधी तरी मुद्द्यावर उत्तर द्या. नेहमीच इकडे तिकडे भरकटत जाऊ नका,' असं ट्विट केलं.
 
 
स्मृती इराणी यावरच थांबल्या नाहीत. माझं प्रत्येक संभाषण हे आदरणीय या शब्दाने सुरू होतं, असं लंगडं समर्थन त्यांनी केलं. मात्र, नेटिझन्सवाल्यांना स्मृती इराणींना खुपल्याच. स्मृती इराणी यांनी पूर्वीच्या ट्विट्समध्ये कोणाकोणाला डीअर संबोधलं आहे, डिअर संबोधणे कसं प्रोफेशनल वागणुकीचं लक्षण आहे किंवा पंतप्रधान मोदींनी कशा प्रकारे इतर महिलांना ट्विटमध्ये डीअर संबोधलं आहे, हे ट्विट्स होऊ लागले.
 
 
या ट्विटवर स्मृती यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर अशोक चौधरी यांनी उत्तर दिले की, हा अपमानकारक शब्द नाही तर सन्मानार्थ चर्चेच्या सुरुवातीला वापरला जाणारा शब्द आहे. तुम्ही मुख्य मुद्याला गोल-गोल फिरवण्यापेक्षा कधी तरी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.