शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

‘सनातन’कडून साक्षीदारावर दडपण आणण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 6, 2016 01:51 IST

मेघा पानसरे : पोलिसांनी घेतली संरक्षणाची जबाबदारी कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे परंतु अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र सनातन संस्थेकडून राजारामपुरी पोलिसांना आले आहे. त्यातील भाषा संरक्षणाची असली तरी मूळ उद्देश वेगळा आहे. साक्षीदारावर थेट दडपण आणण्याचा प्रयत्न ‘सनातन’चा आहे, असे ...


मेघा पानसरे : पोलिसांनी घेतली संरक्षणाची जबाबदारी

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे परंतु अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र सनातन संस्थेकडून राजारामपुरी पोलिसांना आले आहे. त्यातील भाषा संरक्षणाची असली तरी मूळ उद्देश वेगळा आहे. साक्षीदारावर थेट दडपण आणण्याचा प्रयत्न ‘सनातन’चा आहे, असे स्पष्ट मत मेघा पानसरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
‘सनातन’च्यावतीने अँड. संजीव पुनाळकर यांनी संस्थेच्या लेटरहेडवर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या पत्त्यावर हे पत्र पाठविले आहे. एका अत्यंत संवेदनशील खटल्यातील तितक्याच गंभीर पत्राबाबत पोलिसांनी बेफिकीरी दाखविली होती. पत्राच्या मथळ्यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. मेघा पानसरे व कॉ. दिलीप पोवार यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेतली. तेव्हा पत्राची सर्व स्तरांवर दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश देशपांडे यांनी तपास पथकांना दिल्याचे सांगितले. साक्षीदाराच्या संरक्षणाची पूर्णत: जबाबदारी आमची आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.
‘सनातन’च्या पत्राची दखल पोलिसांनी घेतली नव्हती. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस खडबडून जागे झाले. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सायंकाळी शाळकरी मुलाच्या घरी भेट देऊन पालकांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)
---------------