शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पर्रिकरांचा करिष्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 15, 2015 01:41 IST

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील राजकीय करिष्मा कायम ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न रविवारी भाजपाने त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्यक्रमात केला.

- सद््गुरू पाटील,  पणजीसंरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचा गोव्यातील राजकीय करिष्मा कायम ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न रविवारी भाजपाने त्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त केलेल्या कार्यक्रमात केला. भाजपाचा हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच होते.पर्रिकर दिल्लीस गेले, तरी त्यांच्यापासून गोव्याला वेगळे करता येणार नाही, तसेच त्यांना बाजूला ठेवून गोवा भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीस सामोरा जाऊ शकत नाही. त्यामुळे पर्रिकर यांच्या सत्कारानिमित्त पक्षाने शक्तिप्रदर्शन करत काँग्रेसचे मनोबल कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीपर्यंत पर्रिकर यांचा करिष्मा कायम ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.भाजपाने पक्षाच्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघांत सर्वेक्षण केले होते. त्यातून लोकांचे सरकार व भाजपाचे मंत्री आणि आमदारांबाबत काय बोलतात, हे जाणून घेऊन, त्यावरील अहवालावर कोअर कमिटीमध्ये चर्चाही झाली. सर्वेक्षणातून काही मंत्री व आमदार अडचणीत असल्याची पक्षाला कल्पना आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा विधानसभा निवडणुकीस सामोरा जाईल, पण पर्रिकर हेच गोवा भाजपाचे प्रचार प्रमुख असतील. रविवारी कांपाल येथे झालेल्या सत्कार सोहळ््यावेळीही पर्रिकर यांनी जुवारी पुलाची निविदा दोन-तीन महिन्यांत येईल व काणकोणमधीलही पूल लवकरच होतील, हे सांगून टाकले. गोव्याला जे हवे ते केंद्राकडून करून घेऊ, हे त्यांनी पटवून दिले. पर्रिकर हे शुक्रवारपर्यंत अमेरिकेतच होते. गोव्यात पर्रिकर आणि पक्षाचे सतीश धोंड हे दोघेही नसताना दत्ता खोलकर, मुख्यमंत्री पार्सेकर, मंत्री दिलीप परुळेकर, सदानंद तानावडे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी जमविली होती. २०१७च्या निवडणुकीत भाजपाला स्वीकारण्यासाठी त्यांना विश्वासार्ह चेहरा लागेल. ख्रिस्ती मतदारांतही स्थान असल्याने पर्रिकर यांनाच प्रचार प्रमुख म्हणून पुढे केले जाईल.