शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहाला आताच रोखण्याचा प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 02:32 IST

जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाला रोखण्यासाठी आतापासनच प्रयत्न करावेत, अन्यथा २0३0 सालपर्यंत हा सातवा मोठा मनुष्यहानी घडवून आणणारा आजार ठरू शकेल

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाला रोखण्यासाठी आतापासनच प्रयत्न करावेत, अन्यथा २0३0 सालपर्यंत हा सातवा मोठा मनुष्यहानी घडवून आणणारा आजार ठरू शकेल, असे इशारावजा आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन-व्हू) ने भारतासह सर्व दक्षिण आशियाई देशांना केले आहे. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल रोजी आहे.मधुमेहाला रोखण्यासाठी लहान मुलांच्या खाद्यपदार्थांचेही नियमन करण्यात यावे, तसे केल्यास मुलांसाठीचे खाद्यपदार्थ विकत घेताना ते मधुमेहास पूरक आहेत वा नाहीत, हे ग्राहकांना कळू शकेल. मधुमेह ही हल्ली मोठी बातमी बनू शकत नाही. पण २0३0 सालपर्यंत याच आजाराने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण मोठे असेल, हे लक्षात ठेवून शासन यंत्रणा, समाज आणि व्यक्ती या सर्वांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी, असे व्हूचे म्हणणे आहे. दर चार व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असतो आणि त्यातील निम्म्या लोकांना आपणास हा आजार आहे, हेच माहीत नसते. अशा स्थितीत मधुमेह असाच वाढत राहिला तर त्याचे आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत असे खूपच वाईट परिणाम होतील, असा इशारा व्हूच्या दक्षिण आशियाई विभागाच्या प्रमुख पूनम खेत्रपाल सिंग यांनी दिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)शारीरिक हालचाली कमी असणे आणि वजन फारच वाढणे यांमुळे टाइप टू पद्धतीचा मधुमेह होतो. तो टाळणे शक्य असते आणि वेळेत निदान झाल्यास त्यावर उपचारही शक्य आहेत. पण स्वत: काळजी व उपचार न घेतल्यास अवयव वा मज्जासंस्था निकामी होऊ शकते, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि अंधत्वही येते, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे नियमित, ठराविक व वेळेवर सकस आहार घेणे, शर्करायुक्त पेये टाळणे गरजेचे आहे. अर्थात हा आहारही गरजेनुसार आणि गरजेइतकाच घ्यावा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.