शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

‘तृणमूलला आव्हान देणाऱ्यांचे हात छाटू’

By admin | Updated: June 24, 2015 00:11 IST

सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्याचे दु:साहस करणाऱ्यांचे हात छाटण्यात येतील आणि डोळे फोडले जातील, अशी धमकी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे

कोलकाता : सत्तारूढ तृणमूल काँग्रेसला आव्हान देण्याचे दु:साहस करणाऱ्यांचे हात छाटण्यात येतील आणि डोळे फोडले जातील, अशी धमकी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दिली आहे. बॅनर्जी यांच्या या धमकीवर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.‘जे लोक तृणमूलकडे डोळे वटारून पाहतील त्यांचे डोळे फोडून त्यांना रस्त्यावर फेकून देऊ. जर कुणी आमच्यावर हात उगारला तर आम्ही त्यांचे हातच छाटून टाकू. परंतु लोकशाहीत सामान्य माणसाचाच शब्द शेवटचा शब्द असतो, हे तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे,’ असे २७ वर्षीय अभिषेक बॅनर्जी म्हणाले. २४ परगणा जिल्ह्याच्या बसिरहाट येथे एका सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.प्रथमच खासदार बनलेले बॅनर्जी यांच्या या वादग्रस्त विधानावर विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कमल बेरिवाल यांनी तर बॅनर्जी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. बॅनर्जी यांनी विरोधकांवर हल्ले करण्यासाठी तृणमूल कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, राज्य सचिव सूर्यकांत मिश्रा यांनीही बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. (वृत्तसंस्था)