शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

गजबजलेल्या रस्त्यावर विषारी इंजेक्शन टोचून प्रेयसीच्या पतीची हत्या

By admin | Updated: January 10, 2017 09:25 IST

अनिशचे ज्या मुलीवर प्रेम होते तिचे रवी कुमार यांच्याबरोबर लग्न झाले होते. अनिश आणि रवी कुमार यांची पत्नी एकाच कॉलेजमध्ये होती.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 10 - कुणा दुस-याची पत्नी बनलेल्या प्रेयसीला परत मिळवण्यासाठ प्रियकराने फिजीयोथेरपीस्टच्या मदतीने तिच्या पतीची हत्या घडवून आणली. एखाद्या हेरगिरी चित्रपटातील दृश्याप्रमाणे भर रस्त्यात विषारी इंजेक्शन टोचून ही हत्या झाल्याने  दिल्लीच्या सदर बाजारात शनिवारी एकच खळबळ उडाली. कोटक महिंद्रा बँकेत कॅशियर असलेले रवी कुमार (27) आपले काम संपवून घराच्या दिशेने चालले होते. 
 
संध्याकाळी 7.15 च्या सुमारास ते सदर बाजारातील चित्रपटगृहाजवळ येताच गळयाला काहीतरी टोचल्यासारखे वाटले. म्हणून त्यांनी गळयाला हात लावला तर, त्यांच्या हाताला रक्त लागले. अचानक रक्त कसे आले म्हणून मागे वळातच ते काही सेकंदात खाली कोसळले. खाली पडताना त्यांनी मानेवर टोचणी मारणा-या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला पकडले. 
 
तिथे असणारे प्रत्यक्षदर्शी लगेचच त्यांच्या मदतीला धावले व त्यांनी संशयित प्रेमला पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रेम फिजियोथेरपीस्ट असून त्याच्या चौकशीतून मुख्य आरोपी अनिश यादवचे नाव समोर आले. रवी कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 
 
अनिशचे ज्या मुलीवर प्रेम होते तिचे रवी कुमार यांच्याबरोबर लग्न झाले होते. अनिश आणि रवी कुमार यांची पत्नी एकाच कॉलेजमध्ये होती. अनिशने अनेकदा लग्नाचा प्रस्तावर देऊनही तिने रवी कुमार यांच्याबरोबर संसार थाटला. रवी कुमार यांना हटवल्यानंतर त्यांची पत्नी  प्रेयसी बनून पुन्हा आपल्या आयुष्यात येईल म्हणून अनिशने प्रेमला साथीला घेऊन हा सारा कट रचला. 
 
कुठल्याही कचाटयाच सापडू नये यासाठी अनिशने इंटरनेटवर सर्च करुन हा प्लान बनवला होता. ब्रिटन आणि जर्मनीमध्ये अशा पद्धतीने रस्त्यात चालत असताना दोन हत्या झाल्या होत्या. ज्यामध्ये अद्याप आरोपी सापडलेले नाहीत. अनिशने या हत्येसाठी प्रेमला दीड लाख रुपये दिले होते. फिजीयोथेरपीस्ट असल्याने प्रेमला विषारी औषधांचा अभ्यास होता. त्याने रुग्णालयातून ही औषधे चोरल्याचे पोलिसांना सांगितले.