शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून काढला साडे नऊ लाख घनमीटर गाळ ७३ गावांमध्ये काम सुरु : १६ कोटी ६६ लाखांचा खर्च

By admin | Updated: June 14, 2016 17:59 IST

जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजनेतंर्गत २३२ गावांतील ५९९ कामांच्या माध्यमातून २६ लाख ६४ हजार ९८३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजनेतंर्गत २३२ गावांतील ५९९ कामांच्या माध्यमातून २६ लाख ६४ हजार ९८३ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
चाळीसगाव व भडगाव तालुक्यात सर्वाधिक कामे
जिल्हा प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून नाला खोलीकरण तसेच अन्य कामे सुरु आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील सर्वाधिक २४ गावांमध्ये गाळ काढण्याचे कामे सुरु आहेत. त्यापाठोपाठ भडगाव तालुक्यात ११ गावांमध्ये काम सुरु आहे. या कामांमधून तब्बल दोन लाख ५५ हजार ३१५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पाचोरा तालुक्यातील पाच गावांमधून तीन लाख ८५ हजार ७८६ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात सर्वाधिक शासकीय कामे
जिल्हा प्रशासनातर्फे जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण, गाळ काढणे तसेच विहिर खोलीकरणाचे कामे सुरु आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील ५८ गावांमध्ये शासनातर्फे कामे सुरु आहेत. शासनातर्फे १६ लाख ९ हजार ६४५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यापाठोपाठ जळगाव तालुक्यातील १२ गावांमधून एक लाख ५५ हजार ८ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.

१६ कोटी ६६ लाखांचा खर्च
शासकीय योजनेतून गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ९ कोटी २४ लाखांचा खर्च केला आहे. त्यात सर्वाधिक ३ कोटी ५० लाखांचा खर्च हा अमळनेर तालुक्यावर करण्यात आला आहे. तर एरंडोल तालुक्यात एक रुपयांचा देखील खर्च करण्यात आलेला नाही. लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामांवर सात कोटी ४२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक खर्च दोन कोटी ७७ लाख इतका खर्च पाचोरा तालुक्यात झाला आहे. तर एरंडोल व रावेर तालुक्यात ६६ हजारांचा खर्च करण्यात आला आहे.

एक लाख १७ हजार मीटरची रुंदी वाढली
शासकीय योजना व लोकसहभागातून गाळ काढल्यामुळे तब्बल एक लाख १७ हजार ५०९ मीटरचे रुंदीकरण व खोलीकरण झालेले आहे. याचा सर्वाधिक लाभ हा जामनेर तालुक्याला होणार आहे. त्यापाठोपाठ अमळनेर व भडगाव तालुक्यांना होणार आहे.