शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार ही लाजिरवाणी बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2016 22:42 IST

जळगाव- देशात समानतेची मूल्ये रूजविणारे महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. पण दुसर्‍या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याच्या मध्यवर्ती भागात महिलाविरोधी फतवे जातपंचायती काढत आहेत. समाजमूल्ये तुडवीली जात आहेत ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोळकर यांनी शहरात व्यक्त केले.

जळगाव- देशात समानतेची मूल्ये रूजविणारे महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा उदोउदो केला जातो. पण दुसर्‍या बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्याच्या मध्यवर्ती भागात महिलाविरोधी फतवे जातपंचायती काढत आहेत. समाजमूल्ये तुडवीली जात आहेत ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ.हमीद दाभोळकर यांनी शहरात व्यक्त केले.
अल्पबचत भवनात समता परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ.दाभोळकर सहभागी झाले. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष अरुण जाधव, अशोक पवार, अशोक बिर्‍हाडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देवीदास महाजन, अंनिसचे डी.एस.कट्यारे, मिलिंद बागुल, भरत शिरसाठ, आय.सी.शेख, ए.एस.झोपे आदी उपस्थित होते.
मारेकरी सापडत नाहीत याची खंत
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन ३० महिने होत आले, पण अजूनही मारेकरी सापडले नाहीत. कलबुर्गी, पानसरे यांच्या हत्येबाबतही तपास व्यवस्थित होत नाही. ही खेदजनक बाब असल्याचे डॉ.हमीद दाभोळकर म्हणाले.

आंबेडकरांचे फक्त नाव घेतले जाते
एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू यांच्या नावाचा शासन उदोउदो करीत आहे. आंबेडकर यांचे लंडनमधील घर घेतले. पण दुसर्‍या बाजूला समाजमूल्ये दुर्लक्षित आहेत. समाजमूल्ये रूजविण्याची गरज आहे. डॉ.दाभोळकर म्हणाले.

अंनिस देव, धर्माच्या विरोधात नाही
अंनिस देव, धर्माच्या विरोधात नाही. पण आमच्यावर धर्म बुडवायला निघाले, असा आरोप होतो. आमचा लढा देवाच्या नावाने होणारी फसवणूक, शोषण याविरोधात आहे, असेही त्यांनी सांगितले.

बाल कल्याण मंत्र्यांवर टिका
शनि चौथर्‍यावर महिलांनी जाणे योग्य नसल्याचे म्हणणार्‍या राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यांनी स्वत: आपल्या वडीलांना अग्नीडाग दिला आहे. याचा अर्थ समानतेची फक्त भाषा केली जाते. अंमलबजावणी केली जात नाही. राज्यात अजूनही स्त्री पुरूष समानतेबाबत प्रबोधनाची गरज असल्याचे डॉ.हमीद दाभोळकर बाल कल्याण मंत्र्यांवर टिका करताना म्हणाले.

शिक्षकांनी जातपात मोडण्यासाठी प्रयत्न करावेत
शिक्षकांनी जातपात मोडण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी. राजकारण, समाजकारणात जातींना महत्त्व आले आहे. रोटी बेटी व्यवहार जातीनुसार होत असल्याने जाती पातींचा विषय पुढे येतो. अलीकडे तर महापुरूषांनाही जाती पातींमध्ये विभागण्यात आले आहे. जात पात नष्ट करण्यासाठी शिक्षकांनी प्रथम आपल्या मनातून जात काढून टाकावी. शिक्षकांनी विवेकशील समाज निर्मितीसाठी मूल्य रुजवायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.