शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून सात मुलींवर अत्याचार

By admin | Updated: August 13, 2014 04:09 IST

बंगळुरूमध्ये एका खासगी शाळेतील शिक्षकाने सात मुलींवर ४५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

बंगळुरू : एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच बंगळुरूमध्ये एका खासगी शाळेतील शिक्षकाने सात मुलींवर ४५ दिवस लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे लैंगिक गुन्ह्यांविरुद्ध निदर्शने, मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे दिशादर्शक आणि इतर कठोर उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी शाळेच्या परिसरात सावजाच्या शोधात फिरणाऱ्यांवर आळा बसलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पूर्व बेंगळुरुमधील शाळेत एका सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने क्षुब्ध नागरिक शहराच्या रस्त्यांवर उतरले होते. तर आता शहराच्या दुसऱ्या टोकावर शाळकरी मुलींवर त्यांच्याच शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. कानाकापुरा रोडवरील एका खासगी शाळेतील ६४ वर्षीय पार्टटाईम शिक्षकाने ४५ दिवसांहून अधिक काळ तिसऱ्या आणि चौथ्या वर्गातील सात मुलींवर लैंगिक अत्याचार केला. एका आठ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या पालकाच्या तक्रारीवरून शिक्षक चंद्रमौली याला ५ आॅगस्टला अटक करण्यात आली. चंद्रमौली हा निवृत्त पोस्टमन असून आपल्या मित्राच्या शाळेत तो शिक्षक आहे. यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच शाळा तात्पुरती बंद करण्यात आली. शाळा सोमवारी पुन्हा सुरू झाली. परंतु शिक्षकाच्या भीतीने अनेक मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिला. दरम्यान आणखी तीन मुलींच्या पालकांनी तालघट्टापुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राचार्य लक्ष्मीकांत यांना अटक करण्यात आली. त्यांची जामिनावर सुटका झाली. (वृत्तसंस्था)