अहमदनगर: तालुक्यातील नांदगाव शिंगवे येथे शनिवारी सायंकाळी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. या घटनेतील आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी १५ वर्षे वयाची असून घटनेनंतर मुलीच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांकडे तक्रार केली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी आरोपीच्या शोधार्थ नाकाबंदी केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}