शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'मोदी सरकारने जिद्दीपणा सोडावा'; डॉ. शाहिद जमील यांनी कोरोना सल्लागार ग्रुपचा दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 09:45 IST

Senior virologist Shahid Jameel resigned: शाहिद जमील हे अशोका युनिव्हर्सिटीच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत. त्यांनी नुकताच न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतात वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित नीती बनविण्यासाठी जिद्दी प्रतिक्रियांचा सामना करत आहेत.

वरिष्ठ व्हायरॉलॉजिस्ट डॉ शाहिद जमील (Virologist Shahid Jameel) यांनी रविवारी भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) च्या वैज्ञानिक सल्लागार ग्रुपच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. शाहिद जमील हे केंद्र सरकारने बनविलेल्या एका खास सल्लागार समितीचे सदस्य होते, त्यांच्यावर व्हायरस जीनोम स्ट्रक्चरची ओळख पटविण्याची जबाबदारी होती. (Senior virologist Dr. Shahid Jameel has resigned from a forum of scientific advisers set up by the government to detect variants of the coronavirus)

कोरोना संकटात केंद्र सरकारकडून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांना कोरोनाचे जीनोम स्ट्रक्टर ओळखण्याच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचा अध्यक्ष बनविण्यात आले होते. मात्र, त्यांनी रविवारी आपल्या पदावरून राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनामा का दिला हे अद्याप समोर आलेले नाही. शाहिद जमील हे अशोका युनिव्हर्सिटीच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे संचालक आहेत. त्यांनी नुकताच न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, भारतात वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित नीती बनविण्यासाठी जिद्दी प्रतिक्रियांचा सामना करत आहेत. या लेखातून त्यांनी मोदी सरकारला वैज्ञानिकांचे म्हणणे ऐका, तसेच कोरोना पॉलिसी बनविताना जिद्दीपणा सोडण्याचा सल्ला दिला होता. 

याचबरोबर एक व्हायरॉलॉजिस्ट म्हणून कोरोना आणि लसीकरण यावर नजर ठेवून होतो. माझ्या अंदाजानुसार कोरोनाचे अनेक व्हेरिअंट पसरत आहेत. हेच कोरोना व्हायरस कोरोनाच्या पुढच्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला होता. 

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. दररोज हजारो लोक बळी जात आहेत. तर लाखोंच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत आहेत. ऑक्सिजन कमतरता, व्हेंटिलेटर कमतरता, बेड अनुपलब्ध, औषधांची टंचाई अशा संकटात लोक सापडले आहेत. अशावेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने लोक चिंतेत पडले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी