देहरादून : वायुदलाचे विमान उतरताना त्याचे टायर फुटले. सुदैवाने यात कसलीही हानी झाली नाही. येथील जॉली ग्रान्ट विमानतळावर ही मोठी दुर्घटना टळली. देहरादूनपासून ३० कि.मी. अंतरावर हे विमानतळ आहे. विमानात वरिष्ठ अधिकाऱ्यासह १० जण होते. भारतीय वायुदलातील हे ४५ आसनी विमान उतरत असताना त्याचे टायर फुटले. या अपघातातून विमानातील लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह सर्व लोक बालंबाल बचावले, पण या अपघातानंतर विमान हवाईपट्टीवरच उभे राहिल्याने इतर विमानांच्या वाहतुकीत अडथळा आला, असे सूत्रांनी सांगितले.
विमान उतरताना टायर फुटले
By admin | Updated: March 13, 2016 03:54 IST