शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादाची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आलीय - राष्ट्रपती

By admin | Updated: March 2, 2017 21:31 IST

गेल्या काही दिवसांपूर्वीपासून विद्यापीठांमध्ये राष्ट्रवादाच्या मुद्यावरून झालेली हाणामारी आणि शांतीचा संदेश देणाऱ्या गुरमेहेर कौरला देण्यात आलेल्या

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,  दि. 2 - गेल्या काही दिवसांपूर्वीपासून विद्यापीठांमध्ये राष्ट्रवादाच्या मुद्यावरून झालेली हाणामारी आणि  शांतीचा संदेश देणाऱ्या गुरमेहेर कौरला देण्यात आलेल्या धमक्यांबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तसेच सर्वांनी मिळून राष्ट्रवादाची नव्याने व्याख्या करण्याची वेळ आली आहे, असा सल्लाही राष्ट्रपतींनी दिला आहे. 
रामजस महाविद्यालयात अभाविप आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेत एका कार्यक्रमाच्या आयोजनावरून मतभेद झाल्यानंतर दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली होती. गुरमेहेर कौर या तरुणीने या हाणामारीसाठी  अभाविपला दोषी ठरवत त्यांचा निषेध केला होता. त्यानंतर गुरमेहेरवर एका फोटोवरून टीका होऊ लागली. 
दरम्यान, यासाठी जबाबदार असलेल्यांना राष्ट्रपतींनी खडेबोल सुनावले. " ज्या समाजात महिलांचा आदर होत नाही, अशा  समाजाला मी सभ्य समजत नाही, असहिष्णू लोकांना या देशात काहीही स्थान नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला महत्त्वपूर्ण अधिकार आहे,"  असे ते म्हणाले. 
विद्यापीठांच्या आवारात हाणामाऱ्या करणाऱ्यांनाही राष्ट्रपतींनी सुनावले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हिंसक कृत्ये करण्यापेक्षा वाद विवाद, चर्चा कराव्यात, कॉलेजच्या आवारातील अशा घटना पाहिल्यावर दु:ख होते. एकंदरीत राष्ट्रवादाची व्याख्या सर्वानी मिळून नव्याने तयार करण्याची वेळ आली आहे, असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला.