बंगळुरू पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा : दिवसा नोकरी,
रात्री इंटरनेट; दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याची कबुली
बंगळुरू : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेसाठी भारतातून टि¦टर अकाउंट चालविणा:या मेहदी मसरूर बिस्वास याला बंगळुरू पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली असून, त्याने गुन्हाही कबूल केला.
‘चॅनल 4’ या ब्रिटिश वृत्तवाहिनीने ‘इसिस’चे टि¦टर अकाउंट चालविणारा भारतीय आहे आणि तो बंगळुरूत राहात असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पोलिसांनी 24 वर्षीय मेहदीला तो भाडय़ाने राहत असलेल्या एका खोलीच्या फ्लॅटमधून अटक केली. मागील अनेक वर्षापासून आपण ‘शमी विटनेस’ या नावाने जिहादी समर्थक टि¦टर चालवीत होतो व आपण इंग्रजी बोलणा:या इसिसच्या दहशतवाद्यांच्या अगदी जवळचे आहोत, अशी कबुली मेहदीने दिल्याचे कर्नाटकचे पोलीस महासंचालक एल. पचाऊ यांनी सांगितले. तो ‘इसिस’मध्ये नव्याने दाखल होणा:या सदस्यांसाठी प्रेरणा व माहितीचा स्नेत बनलेला होता, असे पचाऊ म्हणाले.
टि¦टरवर मेहदीचे 17,क्क्क् समर्थक होते. तो या भागातील चालू घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून टि¦टरवर अतिशय आक्रमकपणो आपले मत मांडत होता, असे पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी सांगितले.
सव्वादोन मिनिटांची मुलाखत
च्‘मी कोणतेही वाईट कर्म केलेले नाही. मी कुणालाही इजा पोहोचविलेली नाही. मी कोणता कायदाही मोडलेला नाही. मी भारताच्या लोकांविरुद्ध युद्ध पुकारले नाही आणि हिंसाचार माजविला नाही. मी भारताच्या मित्र राष्ट्रांविरुद्धही युद्ध छेडले नाही,’ असे मेहदी बिस्वास याने ‘चॅनल 4’ला दिलेल्या आपल्या एका संक्षिप्त मुलाखतीत म्हटले होते.
च्‘अटक होण्याची वेळ येईल तेव्हा मी अटकेला अजिबात विरोध करणार नाही, हे मी स्पष्टपणो सांगू इच्छितो. माङयाजवळ कोणत्याही प्रकारचे शस्त्र नाही. माङो कुटुंब आर्थिकदृष्टय़ा माङयावर अवलंबून असल्याकारणाने मी इसिसमध्ये सामील झालो नाही,’ असेही आपल्या 2.12 मिनिटांच्या या मुलाखतीत मेहदी म्हणाला होता.
मेहदी हा आपली खरी ओळख लपविण्यासाठी अतिशय सावध होता. आपला खरा चेहरा कधी उघड होणार नाही, याची त्याला पक्की खात्री वाटत होती. परंतु ‘चॅनल 4’ने त्याची ओळख जाहीर केली आणि भारतीय तपास संस्थांना माहिती दिली.
मेहदीला पगार
5.3 लाख रुपये
बंगळुरू येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक 5.3 लाख रुपये पगारावर मॅन्युफॅक्चरिंग एक्ङिाक्युटिव्ह पदावर काम करणारा मेहदी
हा इंजिनीअर आहे.
इसिससाठी घेतले 60 जीबी स्पीडचे इंटरनेट कनेक्शन
मेहदी हा 2क्क्3 पासूनच लेव्हेंटाइन क्षेत्रत रुची घेत होता. या क्षेत्रला पूर्व भूमध्य सागरी क्षेत्र असेही संबोधले जाते. या क्षेत्रत सायप्रस, इस्नयल, जॉर्डन, फिलिस्तीन, सीरिया आणि दक्षिण तुर्कस्तानचा समावेश होतो. मेहदी हा दिवसा कंपनीत काम करायचा आणि रात्री इंटरनेटवर सक्रिय असायचा. इसिस आणि आयएसएलशी संबंधित सर्व ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी त्याने मासिक हप्त्यावर 6क् जीबी इंटरनेट कनेक्शन घेतले होते, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.