नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार दिल्लीबाहेर असल्याने त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी होणारी काँग्रेस-राकाँ नेत्यांची बैठक रद्द करण्यात आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जागा वाटपासंदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक आता बुधवारी किंवा त्यानंतर एक-दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आजारी असल्याने, आजची बैठक रद्द झाल्याचे काँग्रेसच्या सूत्रंनी सांगितले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राकाँचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. यामध्ये त्यांची पूर्वीप्रमाणो विधानसभा निवडणूक एकत्रितपणो लढण्याची सहमती झाली होती. त्यानंतर पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, आर.आर. पाटील यांची बैठक झाली होती. यामध्ये महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय स्थितीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसशी आघाडी करण्याच्या शक्यतेबद्दल विचारविनिमय करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी झाल्यामुळे राकाँला विधानसभेत गेल्यावेळेपेक्षा अधिक जागा हव्या आहेत. भाजपा-शिवसेना युतीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भाजपा-शिवसेना विरोधी मतांचे विभाजन टाळणो आवश्यक असल्याबद्दल दोन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे काँग्रेस सूत्रचे म्हणणो आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)