शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस स्टेशनमध्ये तुंबळ हाणामारी

By admin | Updated: May 8, 2016 23:08 IST

जळगाव : पूर्ववैमनस्यातून आंबेडकर नगरात रविवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, त्यानंतर हा वाद शनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर तेथेही जोरदार हाणामारी झाली, त्यात एका जणाचे डोके फुटले असून पोलीस स्टेशन आवारात रक्ताचे ठिकठिकाणी डाग पडले होते. ही घटना घडली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये फक्त दोन महिला कर्मचारी हजर होत्या, त्यामुळे त्याही हा प्रकार पाहून घाबरल्या. या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाच्या २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : पूर्ववैमनस्यातून आंबेडकर नगरात रविवारी दुपारी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली, त्यानंतर हा वाद शनी पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्यानंतर तेथेही जोरदार हाणामारी झाली, त्यात एका जणाचे डोके फुटले असून पोलीस स्टेशन आवारात रक्ताचे ठिकठिकाणी डाग पडले होते. ही घटना घडली तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये फक्त दोन महिला कर्मचारी हजर होत्या, त्यामुळे त्याही हा प्रकार पाहून घाबरल्या. या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाच्या २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेडकर नगरातील बलभीम मित्र मंडळाचे अध्यक्ष शालीक सोनवणे यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले आहे, त्यामुळे त्या मंडळाचे अध्यक्षपद आपल्या गटाकडे यावे यावरुन दोन गटात वाद आहे. आंबेडकर जयंतीच्या दिवशी मिरवणुकीच्या कारणावरुनही दोन गटात वाद झाला होता. आताही ते कारण पुढे करण्यात आले. या वादामुळे आंबेडकर नगर व पोलीस स्टेशन परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
दारुचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचा राग
शनिवारी शनी पेठ पोलिसांनी या भागात कोम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले होते, तेव्हा काही दारुचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. एकमेकाच्या सांगण्यावरुनच ही कारवाई झाल्याचा संशय व्यक्त करत काही जणांनी गोंधळ घातला.
यांच्यावर दाखल झाले गुन्हे
मनपा कर्मचारी सुरेश पोपट पवार (वय ४५ रा. वाघनगर)याच्या फिर्यादीवरुन सतीश मिलिंद गायकवाड, सचिन दशरथ सोनवणे, गणेश राजेश सोनवणे, प्रशांत सुरेश बाविस्कर, प्रकाश मिलिंद गायकवाड, शोभा मधुकर सावळे, रेखा विजय जाधव, लक्ष्मी सचिन सावळे, आशा राजेश सोनवणे व पद्माबाई मिलिंद गायकवाड (सर्व रा.आंबेडकर नगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश मिलिंद गायकवाड (वय ३५ रा.आंबेडकर नगर) याच्या फिर्यादीवरुन गोविंद पंडित सोनवणे, सुरेश पोपट पवार, दीपक पोपट पवार, भारत पंडित सोनवणे, पंकज चंद्रकांत सोनवणे, राहूल कांतिलाल सोनवणे, भिमा गौतम तायडे, गोरख चंद्रमणी तायडे, बंटी चंद्रकांत सोनवणे, विशाल निवृत्ती सोनवणे, पंकज निवृत्ती सोनवणे, चंद्रमणी भिकारी तायडे, वर्षा रोहीदास सावळे, वंदना गोविंद सोनवणे, संगिता भारत सोनवणे,उज्ज्वला दीपक बाविस्कर,गौतम भिकारी तायडे, विशाल कैलास सोनवणे व कैलास सोनवणे (सर्व रा.आंबेडकर नगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.