शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अंगठाच होईल आपली बँक

By admin | Updated: December 31, 2016 05:04 IST

डिजिटल व्यवहार सुलभ करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून

नवी दिल्ली : डिजिटल व्यवहार सुलभ करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नवीन अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ अंगठ्याद्वारे लोकांना पेमेंट करता येईल. त्यामुळे यापुढे आपला अंगठाच आपली बँक बनणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना लकी ड्रॉमार्फत बक्षिसे देण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली.एके काळी निरक्षरांना अंगठेबहाद्दर म्हणून ओळखले जात असे. मात्र आता अंगठा हीच आपली केवळ ओळखच नव्हे, तर बँकही बनणार आहे. येत्या काळात भीमअ‍ॅप जगात आश्चर्य म्हणून ओळखले जाईल. देशात निराशावादी लोकांची कमी नाही. निराशावादी लोकांसाठी माझ्याकडे औषध नाही. मात्र आशावादी लोकांसाठी माझ्याकडे खूप संधी आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, यापूर्वी २जी मध्ये इतके कोटी गेले, कोळशात तितके कोटी गेले, याची चर्चा होत असे. नोटाबंदीनंतर आता काल किती पैसे जमा झाले, आज किती जमा झाले, याची चर्चा होत आहे. नोटाबंदी, डिजिटल पेमेंट आदी विषयांवर टीका करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरही मोदींनी नाव न घेता टीका केली. मोदी यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला, असे एक नेता म्हणाला होता, याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, असे उंदीरच शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान करतात. मला अर्थव्यवस्थेतील उंदरांनाच बाहेर काढायचे होते. आर्थिक आणि भौतिक सुबत्तेमुळे एकेकाळी देशाला सोने की चिडिया म्हटले जायचे. आजही या देशामध्ये 'सोने की चिडिया' बनण्याची क्षमता आहे, असे सांगून नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील नागरिकांनी एकजूट दाखवली. देशाची खरी ताकद दिसली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे, असे सांगून ते मोदी म्हणाले. भीम अ‍ॅपच्या रूपात मी तुम्हाला नववषार्ची सर्वोत्तम भेट देत आहे. नव्या वर्षात प्रत्येकाने किमान पाच वेळा डिजिटल पेमेंट करावे. (लोकमत न्यूज नेटवर्क)- डिजी धन मेळाव्यामध्येच मोदी यांनी भीम हे नवीन मोबाइल अ‍ॅप सुरू केले. भीमअ‍ॅपमुळे डिजिटल पेमेंट करणे अधिक सोपे होणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानातून केवळ अंगठ्याच्या माध्यमातून पेमेंट करता येईल.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान