शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदाद्वारे जागतिकस्तरावर आरोग्य टिकविणे शक्य

By admin | Updated: January 16, 2017 00:48 IST

पाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतीयांना लाभलेली आयुर्वेद प्रणाली सुदृढ राहण्याकरिता परिपूर्ण आहे.

नाशिक : नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाड्यात असलेल्या महाराष्ट्र बॅँक ग्रामीण शाखेच्या बाहेर पैसे काढण्याची स्लीप विक्री झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सदर प्रकार आजूबाजूच्या काही अज्ञात विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक सुभाष परब यांनी दिली आहे.ठाणापाडा येथील सदर बॅँकेच्या शाखेच्या परिसरात पैसे काढण्याची स्लीप वीस रुपये दराने विकली जात होती व सदर स्लीपमध्ये आवश्यक माहिती भरून घेण्यासाठी संबंधितांकडून दहा रुपये घेतले जात होते. सदर प्रकाराला बॅँक व्यवस्थापनाने दुजोरा देत मंगळवारी (दि.३) घडलेल्या घटनेच्या तपासासाठी सुरक्षा तथा माहिती व तंत्रज्ञान अधिकार्‍यांनी ठाणापाडा शाखेला भेट दिली. यावेळी संपूर्ण पाडा त्यांनी पिंजून काढत आदिवासी बांधवांसोबत संवादही साधला. तसेच सदर प्रकार सध्या छुप्या पद्धतीने सुरू आहे का हेदेखील तपासून बघितले; मात्र सध्या असा कुठलाही प्रकार सुरू नसून एजंटांचा गोरखधंदाही नसल्याचे त्यांना आढळून आले आहे. स्थानिक आदिवासी रहिवाशांनीदेखील अशा प्रकारची कुठलीही तक्रार बोलून दाखविली नाही. नोव्हेंबर महिन्यात घडल्या प्रकारामागे काही अज्ञात विद्यार्थी होते व त्यावेळीदेखील बॅँक कर्मचार्‍यांपैकी कोणाचाही त्यामध्ये सहभाग किंवा अज्ञात विद्यार्थ्यांना छुपी मदतही केली नसल्याचा दावा परब यांनी केला आहे. आदिवासींनी सदर शाखेतून सुरळीतपणे बॅँकिंगसेवा पुरविली जात असून, कर्मचार्‍यांनाही त्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शाखेत येणार्‍या ग्राहकांचा कल बघून तेथे पैसे काढण्याच्या व भरण्याच्या पावत्या उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेवारसपणे अतिरिक्त पावत्या उपलब्ध करून देऊ नये, असे बजावण्यात आले आहे.इन्फो...गोरखधंद्याचे पुरावे नाहीबॅँक कर्मचार्‍यांच्या पाठिंब्याने काही एजंटांमार्फत स्लीपची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा संशय घेतला जात होता; मात्र मंगळवारी अधिकार्‍यांनी केलेल्या तपासात असे कुठलेही पुरावे त्यांना ठाणापाडा शाखा किंवा परिसरात आढळून आले नसल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक सुभाष परब यांनी दिली आहे. यापुढे अशा कुठल्याही प्रकाराला किंवा भूलथापांना आदिवासींनी बळी पडू नये, यासाठी बॅँकेच्या कर्मचार्‍यांना त्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.