शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रिक्षातून वृध्द महिलेचे दागिने लांबविणार्‍या तिघांना अटक पाळत ठेवून केली कारवाई : फिर्यादी महिलेने ओळखले तिघांना

By admin | Updated: May 18, 2016 00:44 IST

जळगाव : चालत्या रिक्षात गळा दाबून वृध्द महिलेच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे दागिने लांबवणार्‍या तिघांना मंगळवारी शहर पोलिसांनी पाळत ठेवून ताब्यात घेतले. दरम्यान, फिर्यादी महिलेने तिघांना ओळखल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.धीरज महारु राठोड (वय ४२ मूळ रा.आंबेवडगाव ह.मु.नशिराबाद), शेख जाकीर शेख रहिम उल्ला (वय ३८ रा.नशिराबाद) व आसाराम दोधाराम राठोड (मुळ रा.बर्‍हाणपुर ह.मु.नशिराबाद) अशी तिघांची नावे आहेत.

जळगाव : चालत्या रिक्षात गळा दाबून वृध्द महिलेच्या अंगावरील ४५ हजार रुपये किमतीचे दागिने लांबवणार्‍या तिघांना मंगळवारी शहर पोलिसांनी पाळत ठेवून ताब्यात घेतले. दरम्यान, फिर्यादी महिलेने तिघांना ओळखल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.धीरज महारु राठोड (वय ४२ मूळ रा.आंबेवडगाव ह.मु.नशिराबाद), शेख जाकीर शेख रहिम उल्ला (वय ३८ रा.नशिराबाद) व आसाराम दोधाराम राठोड (मुळ रा.बर्‍हाणपुर ह.मु.नशिराबाद) अशी तिघांची नावे आहेत.
नूरजहाबी अब्दुल वाहब शेख (वय ६५ रा.गेंदालाल मील, जळगाव) सात मे रोजी पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त व लघवीची तपासणीसाठी आल्या होत्या. ते काम आटोपून रिक्षाने घरी जात असताना सकाळी अकरा ते साडे अकरा या कालावधीत कोर्ट परिसर ते ख्वॉजामियॉ चौकात दरम्यान तिघांनी त्यांचा गळा दाबून दागिना लांबविले होते. याप्रकरणी अनोळखी चार जणांविरुध्द शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोर्ट परिसरात ठेवली पाळत
या गुन्‘ाच्या तपासात सर्व संशयितांची माहिती काढल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे विजयसिंग पाटील व प्रीतम पाटील यांनी कोर्ट परिसरात पाळत ठेवली. तिघेजण रिक्षात बसलेले होते. रस्त्याने जाणार्‍या महिलांनाच फक्त ते रिक्षात बसण्यास सांगत होते. दोघं कर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग केला. आकाशवाणी चौकातून ते पुन्हा कोर्ट परिसरात आले. या दरम्यान त्यांनी एकही पुरुषाला बसविले नाही. यातील धीरज व जाकीर हे दोन्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याने तिघांना संशयित म्हणून दुपारी ताब्यात घेण्यात आले.नंतर सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, संजय शेलार, अमोल विसुपते व संजय भालेराव यांनीही त्यांची कुंडली काढली.
फिर्यादी महिलेच्या घरी नेले फोटो
फिर्यादी महिलेचे वय व प्रकृती पाहता सहायक निरीक्षक सारिका कोडापे व प्रीतम पाटील यांनी तिघांचे फोटो काढून हे तेच आहेत का? याची खात्री करण्यासाठी त्यांचे घर गाठले. तेथे या तिघांना त्यांनी ओळखल्याने त्यांना रात्री अधिकृतपणे अटक करण्यात आली. यातील त्या दिवशी रिक्षा चालवणारा फरार आहे. दागिन्यांबाबत अजून त्यांच्याकडून ठोस माहिती मिळू शकली नाही.