े तीन कत्तलखान्यांना ठोकले कुलूप
By admin | Updated: December 22, 2014 00:10 IST
नाशिक : शहरातील तीन कत्तलखान्यांना नोटिसा बजावल्यानंतर गेल्या शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने तातडीने मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत भद्रकाली आणि सातपूर परिसरातील तीन कत्तलखान्यांना कुलूप ठोकण्यात आले. शहरातील नाशिकरोड, भद्रकाली व सातपूर येथील कत्तलखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची मान्यता नसल्यामुळे सदर कत्तलखाने तातडीने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्चन्यायालयाने दिले. या आदेशान्वये महापालिका प्रशासनाच्या वतीने सदर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाईनंतर व्यावसायिकांनी उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची भेट घेऊन कत्तलखाने सुरू करण्याची मागणी केली. जोपर्यंत महामंडळाची मान्यता मिळत नाही व न्यायालयाचा यासंदर्भातील पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कत्तलखाने सुरू करता येणार नाही, असे बहिरम यांनी स्प
े तीन कत्तलखान्यांना ठोकले कुलूप
नाशिक : शहरातील तीन कत्तलखान्यांना नोटिसा बजावल्यानंतर गेल्या शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने तातडीने मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत भद्रकाली आणि सातपूर परिसरातील तीन कत्तलखान्यांना कुलूप ठोकण्यात आले. शहरातील नाशिकरोड, भद्रकाली व सातपूर येथील कत्तलखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची मान्यता नसल्यामुळे सदर कत्तलखाने तातडीने बंद करण्याचे आदेश मुंबई उच्चन्यायालयाने दिले. या आदेशान्वये महापालिका प्रशासनाच्या वतीने सदर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाईनंतर व्यावसायिकांनी उपआयुक्त रोहिदास बहिरम यांची भेट घेऊन कत्तलखाने सुरू करण्याची मागणी केली. जोपर्यंत महामंडळाची मान्यता मिळत नाही व न्यायालयाचा यासंदर्भातील पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कत्तलखाने सुरू करता येणार नाही, असे बहिरम यांनी स्पष्ट केले. सदर कारवाई न्यायालयीन आदेशावरून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.