शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

गुरांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन पकडले तिघे अटकेत : चिंचोलीजवळ औद्योगिक वसाहत पोलिसांची मध्यरात्री कारवाई

By admin | Updated: April 1, 2016 00:37 IST

जळगाव : लहान वाहनात चार गुरांना कोंबून त्यांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन औद्योगिक वसाहत पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर चिंचोली (ता.जळगाव) गावाजवळ पकडले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : लहान वाहनात चार गुरांना कोंबून त्यांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन औद्योगिक वसाहत पोलिसांच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने बुधवारी मध्यरात्रीनंतर चिंचोली (ता.जळगाव) गावाजवळ पकडले. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांचे एक पथक बुधवारी रात्रीच्या सुमारास महामार्गावर औद्योगिक वसाहत, कुसंुबा, चिंचोली परिसरात रात्रीच्या गस्तीवर फिरत होते. मध्यरात्रीनंतर १२.३० ते दीड वाजेदरम्यान चिंचोली गावाजवळ या पथकाने (एमएच १९ बीएम १७७७) क्रमांकाचे चारचाकी वाहन अडवले. या वाहनात चार गुरे पुरेशी जागा नसताना कोंबण्यात आलेले होते. अशा स्थितीत त्यांची वाहतूक केली जात होती. म्हणून पोलिसांनी वाहनातील निदमअली मनुसअली, शेख शाहरूख शेख मोहंमद व शेख आमीन शेख फिरोज (तिघे रा.चोपडा) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुरांचे वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी पोलीस शिपाई भास्कर यशवंत ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायदा कलम ११ (१) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार नन्नवरे करीत आहेत.
सखोल तपास होणार
अटकेतील तिघे जण गुरांना घेऊन औरंगाबादकडे जात असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. ही गुरे चोरीची आहेत का, त्यांना विक्रीसाठी किंवा कत्तलीसाठी नेले जात होते का, याचा सखोल तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.