शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

बंद घरातून तीन लाखाचे दागिने लांबवले

By admin | Updated: July 19, 2016 23:41 IST

जळगाव : शहरात सातत्याने होणार्‍या जबरी चोरी व घरफोडीच्या घटनांनी पोलीस दल जेरीस आले असतानाच सोमवारी पुन्हा महामार्गाला लागून असलेल्या कयुम देशमुख नगरात मुश्ताक अहमद मोहम्मद मजीद शेख (वय ६५) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे दागिने लांबवले आल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजा बंद करुन मागील दरवाजातून पोबारा केला आहे.

जळगाव : शहरात सातत्याने होणार्‍या जबरी चोरी व घरफोडीच्या घटनांनी पोलीस दल जेरीस आले असतानाच सोमवारी पुन्हा महामार्गाला लागून असलेल्या कयुम देशमुख नगरात मुश्ताक अहमद मोहम्मद मजीद शेख (वय ६५) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे दागिने लांबवले आल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मुख्य दरवाजा बंद करुन मागील दरवाजातून पोबारा केला आहे.
मुश्ताक शेख हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. महामार्गाला लागून असलेल्या बॉम्बे बेकरीजवळी कयुम देशमुख नगरात अबु बकर मशीदीजवळ ते वास्तव्याला आहेत. मुलगी साजीया हिच्या लग्नासाठी स्थळ आल्याने मुलाच्या परिवाराला भेटण्यासाठी ते कुटूंबासह सोमवारी सकाळी दहा वाजता चाळीसगावला गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपून रात्री अकरा वाजता घरी परत आले.
मुख्य दरवाजा होता आतून बंद
शेख यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आत जाण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा उघडला नाही. आतून बंद असल्याचे जाणवले. दरवाजा आतून बंद कसा असा प्रश्न त्यांना पडला, त्यामुळे मागील दरवाजाकडे जात असतांनाच खिडकीतून डोकावून पाहिले तर घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. घरात जावून पाहिले तर कपाट व त्यातील लॉकर उघडे होते. त्यात ठेवलेले दागिने पाहिले तर तेही गायब झाले होते. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.
श्वान पथकाकडून तपासणी
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक समाधान पाटील व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्‍यांनी रात्री व सकाळी घराची पाहणी केली. मंगळवारी पंचनामा झाल्यानंतर संशयित गुन्हेगारांची माहिती काढून चौकशी करण्यात आली. फिंगर प्रिंट व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय चोरी झाला मुद्देमाल
८० हजार किमतीचा ४० ग्रॅम सोन्याचा हार
६० हजार किमतीचा ३० ग्रॅम सोन्याचा हार
७५ हजार किमतीचे ३५ ग्रॅमचे सोन्याचे सिक्के
२८ हजार किमतीची १४ ग्रॅमची सोन्याची साखळी
२० हजार किमतीची १० ग्रॅमची पन्ना मोती पोत
२० हजार किमतीच्या सोन्याच्या बागंड्या
१२ हजार किमतीच्या ६ ग्रॅमच्या कानातील सोन्याची बा‘ा
६ हजार किमतीची ३ ग्रॅमची अंगठी
४ हजार किमतीच्या २ ग्रॅमच्या सोन्याच्या बागंड्या
पाचशे रुपये किमतीचे उमविचे गोल्ड मेडल