शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संजय जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने तीन केंद्रीय मंत्री अडचणीत

By admin | Updated: April 15, 2015 16:49 IST

सहा एप्रिल रोजी भाजपाचे माजी नेते संजय जोशी यांचा वाढदिवस होता. यावेळी भाजपा मंत्र्यांनी जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - भाजपाचे माजी नेते संजय जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने भाजपाचे तीन मंत्री अडचणीत आले आहेत.
सहा एप्रिल रोजी भाजपाचे माजी नेते संजय जोशी यांचा वाढदिवस होता. यावेळी भाजपा मंत्र्यांनी जोशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते.  या प्रकरणी केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय क्रीडा मंत्री सर्बानंद सोनवाल व कृषी राज्यमंत्री संजीव बालियान यांना भाजपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर नाईक यांचे सहकारी नितीन सरदारे यांच्याकडून पक्षाने राजीनामा घेतला आहे. 
अमित शहा यांनी दुरध्वनीवरून नाईक यांना फटकारले तसेच इतर ३४ जणांवर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. 
याबाबत बालियन यांना विचारले असता जोशी यांच्या वाढदिवसाबद्दल आपल्याला काही माहित नसून पक्षाकडून कोणतीही नोटीस आली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात खासदार मनोज तिवारी यांचे नाव घेण्यात येत आहे. सरदारे यांनी इतर काही कारणांनी राजीनामा दिला असून ते पक्षातच काम करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. जोशी हे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य होते. पंतप्रधान मोदी गुजरातेचे मुख्यमंत्री असताना जोशी यांच्यासोबत मतभेद झाल्याने जोशींना राजीनामा द्यावा लागला होता.