शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणातून तीन आर्वतन सोडा आमदारांची मुंबईच्या बैठकीत जोरदार मागणी : नाशिकने केले अतिरिक्त पाणी आरक्षण

By admin | Updated: December 1, 2015 23:35 IST

जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाने पाण्याचे अतिरिक्त आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करीत तीन आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.

जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाने पाण्याचे अतिरिक्त आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करीत तीन आवर्तन सोडण्याची मागणी लावून धरली.
गिरणा धरणांवर अवलंबून असलेल्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, पारोळा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यातील गावांमधील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधील २५ टक्के पाणी गिरणा धरणात सोडण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण समितीसमोर २० ऑगस्ट रोजी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. या याचिकेवर यापूर्वी दोन सुनावणी झाल्या आहेत. मंगळवार १ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी होती.

माथा ते पायथा हा विचार करा - गुलाबराव पाटील
समान न्याय वाटप तत्वानुसार गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली. आवर्तन सोडताना माथा ते पायथा हे तत्व गृहित धरल्यास आम्ही पायथ्याजवळ आहोत. त्यामुळे आवर्तन सोडल्यानंतर पाणी पायथ्यापर्यंत सोडून न्याय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

प्रांतिक वाद करायचा नाही : आमदार उन्मेष पाटील
गिरणा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यावर मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव, पारोळा, पाचोरा या नगरपालिकांसोबत काही गावांमधील नागरिक अवलंबून आहेत. आम्ही शेतीसाठी नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत. पाणी मागणीच्या संदर्भात आम्हाला कोणताही प्रांतिक वाद करायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी न सोडल्यास भीषण टंचाई : आमदार किशोर पाटील
नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधून पाणी न सोडल्यास उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार असल्याचे सांगितले. सध्या एक आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणा धरणातील सद्यस्थितीला असलेला जलसाठा लक्षात घेता मार्च महिन्यापर्यंत दुसरे आवर्तन सोडता येईल. मात्र मार्च महिन्यानंतर पिण्याच्या पाण्याचे काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडल्यास जून महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल असे त्यांनी सांगितले.