शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

स्टेंट्सवर एक हजार पट नफा

By admin | Updated: January 18, 2017 05:18 IST

रक्त वाहिन्यांचे आकुंचन रोखण्यासाठी वापरण्यात येणारी नळी (स्टेंट) तयार करणाऱ्यापासून ते रुग्णापर्यंत येते, तेव्हा तिची किमत दहापट झालेली असते

नवी दिल्ली : रक्त वाहिन्यांचे आकुंचन रोखण्यासाठी वापरण्यात येणारी नळी (स्टेंट) तयार करणाऱ्यापासून ते रुग्णापर्यंत येते, तेव्हा तिची किमत दहापट झालेली असते, यावर आता अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे. हा नफा २७० टक्के ते एक हजार टक्के असतो.स्टेंट म्हणजे नळीसारखे उपकरण असते. ते अरूंद अशा मार्गात ठेवले जाते किंवा रक्तवाहिनी उघडी ठेवण्यासाठी वापरले जाते.नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अ‍ॅथॉरिटीने (एनपीपीए) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या स्टेंटच्या व्यापारात वेगवेगळ््या पातळ््यांवर संबंधित असलेले लोक किती नफा (मार्जिन्स) कमावतात, याची माहिती दिली आहे. या सगळ््या व्यवहारात गुंतलेल्या लोकांमध्ये रुग्णालयाचा नफा सर्वात जास्त म्हणजे ६५० टक्के असतो. स्टेंट निर्मात्या कंपन्यांसह रुग्णालये आणि हृदयविकारतज्ज्ञ स्टेंटच्या किमतीवरील नियंत्रणाच्या विरोधात मोठमोठ्याने बोलत असतात हे विशेष. स्टेंटच्या किमतीत सर्वात जास्त वाढ होते ती रुग्णालयांमध्ये. सगळीच रुग्णालये तेवढा नफा कमावतात, असे नाही, परंतु तो ११ टक्के ते ६५४ टक्के या दरम्यान असतो. औषध विरघळवणारा स्टेंट (डीईएस) तयार करण्याचा खर्च हा देशी कंपनीसाठी ८ हजार रुपये आहे आणि विदेशातून आयात केलेल्या डीर्ईएसची किमत पाच हजार रुपयांपासून सुरू होते. भारतात जे स्टेंट्स वापरले जातात, त्यात ९५ टक्के स्टेंट्स हे डीईएस असतात. स्टेंट्सची आयात करणारे किंवा उत्पादक सगळ््यात कमी किंमत आकारतात, पण वितरकाचा व रुग्णालयांचा नफा हा १३ टक्के ते २०० टक्के या दरम्यान असतो, असे या माहितीतून दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क) >डिलर्सला होतो सर्वात मोठा नफाबहुतेक कंपन्या या वितरकामार्फत बाजारपेठेवर नियंत्रण ठेवतात. अनेक कंपन्यांचा दावा असतो की, आम्ही मार्केटिंग करताना नीतीमूल्यांचे पालन करतो. डॉक्टरांना दिली जाणारी लाच आणि रुग्णालयांना दिले जाणारे पैसे (कट्स) या बेकायदा मार्केटिंग दलालीची जबाबदारी डिलर्स किंवा वितरकांकडे सोपविली गेली आहे. म्हणून डिलर्सला दिला गेलेला नफा १३ टक्क्यांपासून ते १९६ टक्क्यांपर्यंत असून, त्यात बेकायदा दलालीचे व्यवहारही समाविष्ट आहेत, असे सांगितले जाते.