शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पटेलांनी घेतली एक हजार तिकिटे

By admin | Updated: October 14, 2015 23:45 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या पाटीदार पटेल समाजाच्या सदस्यांनी राजकोट येथे येत्या रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या

राजकोट : आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत असलेल्या पाटीदार पटेल समाजाच्या सदस्यांनी राजकोट येथे येत्या रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याची सुमारे १००० तिकिटे विकत घेतल्याची माहिती आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एससीए) स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या स्टेडियमवरून मंगळवारी २००० पेक्षा जास्त तिकिटे विकली गेली. तिकीट मिळविण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी सोमवारच्या रात्रीपासूनच स्टेडियमसमोर रांगा लावलेल्या होत्या. यावेळी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीहल्लाही करावा लागला.पटेल आरक्षण आंदोलन लक्षात घेऊन राज्य प्रशासनाने या सामन्याच्या वेळी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट सामन्याच्या वेळी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून तिकीट विकत घेणाऱ्यांसाठी ओळखपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, पाटीदार समाज १८ आॅक्टोबर रोजी आपले डावपेच आखणार असल्याचे समजते. या सामन्याचे तिकीट विकत घेणाऱ्या सर्व पाटीदारांना पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांकडे आपला मोबाईल नंबर, तिकीट आणि आसन क्रमांक नोंदविण्याचे सांगण्यात आले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यानचा तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १८ आॅक्टोबर रोजी राजकोट येथे खेळला जाणार आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता २९००० आहे. (वृत्तसंस्था)