शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बारा गावांची पाणीटंचाई होणार दूर

By admin | Updated: September 16, 2015 23:38 IST

भोर तालुका : जलयुक्त शिवार योजनेतून भरीव कामे

भोर तालुका : जलयुक्त शिवार योजनेतून भरीव कामे
भोर : जलयुक्त शिवार योजनेतंर्गत भोर तालुक्यातील १२ गावांत कृषी छोटे पाटबंधारे, वन विभाग यांच्यासह विविध विभागांकडून विविध प्रकारची १६० कामांपैकी १२८ कामे पूर्ण झाली असून ३२ कामे अपूर्ण आहेत. सदरच्या कामांसाठी सुमारे ४ कोटी ७६ लाख ९९ हजार रुपये खर्च झाला आहे. या कामांमुळे जमिनीत पाणी मुरणार असून बंधार्‍यात, नाल्यात पाणी साचल्याने भविष्यात या १२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेत शिवारात पडलेले पाणी गावात मुरावे, यासाठी भोर तालुक्यातील गृहिणी, महुडेबुद्रुक,पसुरे, कांबरे खे.बा., करंदी खे.बा., वागजवाडी, भोंगवली, ससेवाडी, मोरवाडी, पेंजळवाडी, शिंदेवाडी, वेळू या बारा गावांचा समावेश आहे. या गावात कृषी विभागाकडून सीसीटी, मजगी, बंधारे दुरुस्ती, गाळ काढणे, नाला खोलीकरण, सरळीकरण अशा एकूण १०२ कामांपैकी ७८ कामे पूर्ण झाली असून २४ कामे अपूर्ण आहेत. त्यासाठी एक कोटी २६ लाख ८४ हजार रुपयेखर्च झाला आहे, तर छोटे पाटबंधारे विभागार्तंगत कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, बांधणे गाळ काढणे, बंधार्‍यांची दुरुस्ती करणे, अशी ७ पैकी ६ कामे पूर्ण आहेत. एक काम अपूर्ण आहे. त्यासाठी ५४ लाख ६८ हजार रुपये खर्च झाला आहे. वन विभागाकडून एकूण ४५ पैकी ४१ कामे झाली असून ४ कामे अपूर्ण आहेत. २ कोटी १० लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे.
पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून फक्त दोन कामे घेण्यात आली असून त्यासाठी ५० लाख ५२ हजार रुपये खर्च झाला आहे; मात्र दोन्ही कामे अपूर्ण आहेत. जलसंधारण स्थानिक स्तर अंतर्गत ४ पैकी एक अपूर्ण तर तीन कामे पूर्ण आहेत. ३४ लाख ६२ हजार खर्च झाला आहे, असा एकूण १६० कामांपैकी १२८ कामे पूर्ण तर ३२ कामे अपूर्ण असून सुमारे ४ कोटी ७६ लाख ९९ हजार रुपयेखर्च झाला आहे.
भोर तालुक्यात सर्वाधिक ४० कामांसाठी सुमारे एक कोटी ६ लाख ८९ हजार रुपये खर्च भांेगवली गावात झाला आहे. मात्र पेंजळवाडीत एकही काम झाले नसून एक रुपयाही खर्च झाला नाही. कृषी विभागाकडून सर्वाधिक १०२ कामे झाली असून सर्वांत कमी कामे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून २ कामे झाली आहेत.
चौकट
..तर पाणीटंचाई दूर होऊ शकते
जलयुक्त शिवार योजनेतील या बारा गावांत झालेल्या विविध प्रकारच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. बंधार्‍यात पाणी साचले आहे. यामुळे दर उन्हाळ्यात होणार्‍या पाणीटंचाईवर मात करता येणार आहे; तर काही गावांत शेतीलाही या पाण्याचा उपयोग होणार आहे. सामाजिक वनीकरण व भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून एकही हाती घेण्यात आले नाही, तर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामीण भागातील गावात शिवकालीन साठवण विहीर, विहीर गाळ काढणे, पाईपलाईन दुरुस्ती ही कामे घेऊन दर उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर करता येऊ शकते. मात्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सावळा गोंधळ व उपअभियंता शाखा अभियंता यांच्या दुर्लक्षामुळे कामे हाती घेण्यात आली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

कोट
ससेवाडी येथे चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून लोकवर्गणी भरून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ३९ लाख ७२ हजार रुपयेमंजूर झाले आहे. तिचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर तीन वर्षांपूर्वी वेळू गावासाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २ कोटी ३६ लाख रुपये मंजूर आहे. त्यातील १० लाख ५० हजार रुपयांचे विहिरीचे काम झाले. ही दोन्ही कामे एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या जलयुक्त शिवार अभियानात ग्रामीण पाणीपुरवठाविभागाकडून दाखविण्यात आली आहेत. म्हणजे केवळ काही तरी कामे दिसावीत म्हणून, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने खोटी कामे दाखवली आहेत. या कामांचा जलयुक्त शिवार योजनेशी काहीही संबंध नाही.
- धनाजी वाडकर, बाजार समिती संचालक

फोटो ओळ : जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे वेळू येथे बंधार्‍यात साठलेले पाणी.