नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पं. मदन मोहन मालवीय, ध्यानचंद आणि कांशीराम यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार असल्याचे वृत्त कपोलकल्पित आणि आधारहीन असल्याचे सरकारने म्हटले आहे. भारतरत्नची पाच पदके तयार करण्याची सूचना आपल्या मंत्रालयाने केलेली नाही. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक अशी पदके तयार करण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.तेंडूलकरबाबत अनावश्यक घाईसचिन तेंडुलकर यांना भारतरत्न प्रदान केल्यानंतर राज्यसभेवर त्यांना नामनिर्देशित करण्याची संपुआ सरकारने अनावश्यक घाई दाखविली, असेही या सूत्राचे म्हणणे आहे. दरम्यान, सरकार दिवंगत डॉ. राम मनोहर लोहिया आणि दिवंगत बिजू पटनाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाणे काढण्याची शक्यता आहे, असे संकेत सूत्रांनी दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
भारतरत्नचा प्रस्तावच नाही
By admin | Updated: August 12, 2014 01:55 IST