शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

धर्माच्या नावे महिलांवर अत्याचार नको

By admin | Updated: October 25, 2016 04:49 IST

मुस्लिमांमध्ये असलेल्या तीन वेळा तलाक पद्धतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दोष दिला व या विषयाचे राजकारण करणाऱ्यांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली.

महोबा (उत्तर प्रदेश) : मुस्लिमांमध्ये असलेल्या तीन वेळा तलाक पद्धतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दोष दिला व या विषयाचे राजकारण करणाऱ्यांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. वादग्रस्त बनलेल्या तलाक विषयावर मोदी यांनी प्रथमच जाहीरपणे भाष्य केले. मोदी म्हणाले, ‘‘तलाकचा विषय आता समोर आला आहे. एखाद्या हिंदुने स्त्री भ्रूणहत्या केली तर त्याला जसे तुरुंगात जावे लागते त्याच प्रमाणे एखादा फोनवर ‘तलाक’ असे म्हणतो व माझ्या मुस्लीम भगिनींचे आयुष्य उद्धवस्त होते’’ मोदी उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील महापरिवर्तन मेळाव्यात बोलत होते. तलाकच्या विषयाला हिंदूविरुद्ध मुस्लीम किंवा भाजपविरुद्ध इतर पक्ष अशा वळणावर नेऊ नका, असे आवाहन मोदी यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांना केले. तलाकच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सरकारने दाखल केलेल्या शपथपत्रात महिलांवर धर्माच्या आधारे कोणतेही अत्याचार किंवा भेदभाव होता कामा नये, असे स्पष्टपणे म्हटले आहे. लोकशाहीमध्ये चर्चा झाली पाहिजे. सरकारने आपली भूमिका समोर मांडली आहे. ज्यांना तीन वेळा तलाकवरून विषयांतर करायचे आहे ते लोकांना चिथावणी देत आहेत. देशात तीनवेळा तलाकमुळे महिलांचे जीवन नाश पाऊ पावण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)