जळगाव रोडवर वोखार्ड चौकात वाहतुकीवर नियंत्रण नाही
By admin | Updated: May 11, 2014 00:04 IST
औरंगाबाद : जळगाव रोडवर वोखार्ड चौकात वाहतूक सिग्नल नसल्याने वाहने बेशिस्तपणे पळविली जातात. या चौकातून गरवारे स्टेडियम, नारेगाव, वरूड, वडखा, एमआयडीसी चिकलठाणा, शेंद्राकडे जाणार्यांची गर्दी असते. कचरा डेपोही याच रस्त्यावर असल्याने ट्रक भरधाव वेगाने जातात. या रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटनाही घडल्या असून, कामगार व शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना अपघाताची भीती असते. भरधाव वाहनांना आवर घालण्यासाठी वाहतूक सिग्नल बसवावेत, अशी मागणी मिलिंद निकाळजे, अनिल भालेराव, योगेश हिवराळे, गौतम जाधव, संजय साबळे आदींनी केली आहे.
जळगाव रोडवर वोखार्ड चौकात वाहतुकीवर नियंत्रण नाही
चौघा संशयितांवर गुन्हा : ७ पर्यंत पोलीस कोठडीनाशिक : जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डवर ड्युटीवर असलेल्या दोन पोलीस कर्मचार्यांना चौघांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून, दोघे फ रार झाले आहेत़ दरम्यान, न्यायालयाने दोघा संशयितांना ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डवर शनिवारी सायंकाळी सरकारवाडा पोलीस ठाण्यातील भानुदास हादगे आणि त्यांचे सहकारी ड्यूटीवर होते़ रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास संशयित विलास देवीदास लोणारे (२३, सिन्नर), शाकीर नसीर पठाण (सिडको), सुनील चांगले (रामवाडी), अमोल जाधव (सिन्नर) हे चौघेही रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात आले व तडक प्रिझन वॉर्डकडे गेले़ या ठिकाणी ड्यूटीवर असलेले हादगे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांना हटकले असता या चौघांनीही पळ काढला़ या चौघा संशयितांचा हादगे आणि त्यांच्या सहकार्यांनी पाठलाग केला असता या चौघांनीही रिक्षा अंगावर घालण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ या चौघाही संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याची फि र्याद दाखल करण्यात आली आहे़ यातील लोणारे आणि पठाण या दोघांनाही अटक करण्यात आली असून, उर्वरित चांगले आणि जाधव फ रार झाले आहेत़ दरम्यान, दोघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)