शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसशी संघर्ष नको

By admin | Updated: July 12, 2016 00:54 IST

संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी अनंत कुमार यांच्याकडे येताच मोदी सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस सरकारशी संघर्ष नको असल्याचे संकेत दिले आहेत.

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली संसदीय कामकाज मंत्रालयाची जबाबदारी अनंत कुमार यांच्याकडे येताच मोदी सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस सरकारशी संघर्ष नको असल्याचे संकेत दिले आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री अनंत कुमार यांनी सगळे वादग्रस्त प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाला पुढाकार घेण्यास आधीच सूचविले आहे. अर्थमंत्री अरूण जेटली व इतरांसह अनंत कुमार यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. तीन मुद्यांवरील मतभेद दूर करण्यासाठी जेटली स्वतंत्रपणेही अनौपचारिक चर्चा करीत आहेत. आता हे दिसते आहे की मतभेदातील अंतर बरेच घटले आहे.सत्ताधारी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात वाद निर्माण केलेला विषय म्हणजे शत्रुच्या मालमत्तेचा कायदा. सरकारने दोन वेळा अध्यादेश जारी केला परंतु राज्यसभेत पाठिंबा मिळविण्यात त्याला अपयश आले. आणखी एका अधिवेशन सत्रापर्यंत ते तात्पुरते स्थगित करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. पावसाळी अधिवेशन केवळ २० दिवसांचे असेल. या अल्प कालावधीत जीएसटी विधेयक संमत होईल यासाठी सरकारने जणू कंबर बांधली आहे. माजी संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू हे संघर्षासाठी उत्सुक असल्याचे आणि काँग्रेस सरकारवर कठोर टीका करणारे मानले जात तर अनंत कुमार हे शांत व सौम्य. अनंत कुमार यांना पडद्यामागे काम करायला आणि कमी बोलायला आवडते. अनंत कुमार यांनी खते विभागात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आता त्यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. खते विभागात लक्षणीय असा १०.५० टक्के वाढीचा दर आहे.राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) राज्यसभेत केवळ ७५ खासदार असून जीएसटी विधेयक संमत होण्यासाठी २४५ सदस्यांच्या राज्यसभेत एनडीएला १६३ खासदारांची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला असून अखिल भारतीय अण्णा द्रमुक आणि आणखी दोघे गैरहजर राहिले तर जीएसटी विधेयकावर मतदान घेतल्यास ते संमत होईल, असे दिसते. सरकार नॅशनल इलिजिबिलिटी तथा एन्ट्रन्स टेस्टवरदेखील (नीट) आधीच्या अध्यादेशाच्या जागी दुसरा अध्यादेश काढेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मुलाखतीत ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), नितीशकुमार (बिहार), अखिलेश यादव (उत्तर प्रदेश) आणि नवीन पटनाईक (ओडिशा) या सगळ््या राज्यांना जीएसटी विधेयक संमत व्हावे, असे वाटते कारण ते गरीब लोकांच्या हिताचे आहे, असे सांगितले होते. परंतु मोदी यांनी बदलत्या संख्येचेही संकेत दिले. मोदी म्हणाले ‘‘ज्या पद्धतीचे गणित मांडले जात आहे त्यावरून हा निर्णय (जीएसटी) गरिबांच्या बाजूने होईल.’’लोकसभेत ११ तर राज्यसभेत ४५ विधेयके प्रलंबित आहेत. त्यातील खूप महत्वाची चार अशी - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), विधेयक, जागल्यांना संरक्षण (दुरुस्ती) (व्हिसल ब्लोअर्स प्रोटेक्शन) विधेयक, २०१५, कॉम्पेनसेटोरी अ‍ॅफोरेस्टेशन फंड बिल, २०१६ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक (दुरुस्ती) विधेयक, २०१३.