शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीआयएसएफची सुरक्षा व्यवस्था नाही

By admin | Updated: March 28, 2016 01:06 IST

गेल्या पाच वर्षांत निधीअभावी किमान २७ महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत निधीअभावी किमान २७ महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सुरक्षा संस्थेकडे सुरक्षेची जबाबदारी सोपविणे विशेष मानले जाते. विशेषत: ब्रुसेल्सच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.एकूण विमानतळांपैकी २७ विमानतळांची सुरक्षा केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ), भारतीय राखीव बटालियन्स (आयआरबी), राज्य पोलीस दलांकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे खास नियुक्त केलेल्या सीआयएसएफला बाहेर ठेवण्यात आले. वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने या वर्षाच्या प्रारंभी सादर केलेल्या अहवालात सुरक्षेच्या गंभीर बाबींकडे लक्ष वेधले. विमानतळ सुरक्षेबाबत सध्या सीआयएसएफ हेच एकमेव खास सुरक्षा दल मानले जात असताना ८ अति संवेदनशील आणि १९ संवेदनशील विमानतळांची सुरक्षा या संस्थेकडे नसावी ही बाब चिंताजनक असल्याचे या समितीने स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)