शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षाच नाही

By admin | Updated: February 5, 2017 00:51 IST

राज्यातील भूमिकेबाबत मी समाधानी असून, पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले.

लखनौ : राज्यातील भूमिकेबाबत मी समाधानी असून, पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षाच नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले. उत्तर प्रदेशातील माझ्या जबाबदारीबाबत मी समाधानी असून, देशाचा पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षा नाही, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. दिल्लीच्या बाहेर राहणारे लोक आनंदी असतात, असे त्यांनी गमतीत म्हटले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-सपा युतीला प्रचंड बहुमत मिळेल. ४०३ जागांपैकी ३०० जागा आम्ही जिंकू, असा दावा त्यांनी केला. सरकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लोकांपैकी ५० टक्के लोकांनीही माझ्या सरकारच्या बाजूने मत दिले, तर आम्हाला ३०० जागा मिळतील, असे सांगून ते म्हणाले. या योजनांतील काहींची माहिती देताना ते म्हणाले की, ५५ लाख महिलांना समाजवादी निवृत्तीवेतन मिळत आहे. १८ लाख लॅपटॉप वितरित करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच वैद्यकीयच्या जागा दुप्पट करण्यात आल्या. याशिवाय १०८, १००, १०९ या हेल्पलाईन सेवा तसेच कन्या विद्याधन योजना. गरिबांसाठी अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. वडील आणि सपाचे माजी प्रमुख मुलायमसिंह यादव यांना राजकीय लढाईत नामोहरम केल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, वडील आणि मुलगा या नात्यात कुठेही अंतर नाही. समाजवादी पार्टी आजही त्यांचीच आहे. सायकलही त्यांचीच आहे. नात्यात तसूभरही फरक पडलेला नसून, ते पूर्वीप्रमाणेत भक्कम आहे. वडील-मुलाचे नाते कोणीही बदलू शकणार नाही. समाजवादी पार्टीला इजा पोहोचवू पाहणाऱ्या लोकांपासून स्वत:ला दूर करण्यासाठी हे गरजेचे होते. ही बंडखोरी नाही. नेताजी पक्षात आम्हा सर्वांच्या वर आहेत. समाजवादी पार्टीला पुढे नेण्याची जबाबदारी आता पुढच्या पिढीवर आहे. तिकीटवाटपात तुमचा शब्द प्रमाण राहील, असे सांगितले गेल्यानंतरही तुम्ही मुलायमसिंह यांना पक्षाध्यक्षपदावरून का हटविले, असा प्रश्न केला असता मला केवळ १० आमदारांचा पाठिंबा मिळाला असता, तर ती माझी नाचक्की झाली असती. कुटुंबातील वादामागे कोण आहे या प्रश्नावर अखिलेख म्हणाले की, सपाचे ज्येष्ठ नेते आझम खान साहब यांनी सपात दुफळी कोणी निर्माण केली हे स्पष्टपणे सांगितले आहे. (वृत्तसंस्था)सपा जिंकल्यास नेताजींना आनंदच होईलमुलायमसिंह युतीसाठी प्रचार करतील काय या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात सत्ता कायम राखणे हा आमचा एकमेव उद्देश आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. सपा जिंकल्यास सर्वाधिक आनंद नेताजींनाच होईल. सपाच्या दणदणीत यशामुळे नेताजींचाच आदर वाढणार आहे. आमच्या प्रचारमोहिमेत त्यांची छायाचित्रे आहेत. आमच्या प्रत्येक घोषवाक्यात त्यांचे नाव आहे. मी काँग्रेस-सपा युतीसाठी प्रचार करेन, असे नेताजींनी मला सांगितले आहे.