शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

...तर रामभक्तांचा उद्रेक होईल-विनय कटियार

By admin | Updated: June 4, 2015 00:42 IST

अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे संघ परिवार आणि राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाशी जुळलेले भारतीय जनता

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीअयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे संघ परिवार आणि राम जन्मभूमी मंदिर आंदोलनाशी जुळलेले भारतीय जनता पक्षाचे नेते बयाणबाजी करून पक्ष व सरकारवर दबाव आणत आहेत, तर भाजप नेतृत्व अधिकृतपणे या मुद्यावर आपली वचनबद्धता जाहीर करतानाच यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमताचे कारण पुढे करीत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अलीकडेच राम मंदिर निर्मितीसह पक्षाच्या पारंपरिक पण वादग्रस्त मुद्यांबाबत वचनबद्ध असल्याची ग्वाही दिली होती. सोबतच त्यांच्या अंमलबजावणीसाठी लोकसभेत त्यांच्या पक्षाला दोन तृतीयांश बहुमत म्हणजेच ३७० जागा मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. परंतु आता उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी भूसंपादनाप्रमाणेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी वटहुकूम काढण्याची मागणी केली आहे. राम मंदिरासाठी रामभक्तांनी फार मोठे बलिदान दिले असून हा मुद्दा आता जास्त दिवस लांबणीवर टाकता येणार नाही, अन्यथा रामभक्तांच्या संतापाचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी बुधवारी लखनौत बोलताना दिला. कटियार म्हणाले की, मोदी सरकार या मुद्यावर सत्तेत आले नसले तरी भाजपच्या मतदारांसाठी तो देशाच्या विकासाएवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता सरकारने चर्चेतून अथवा कायद्याच्या माध्यमातून या मुद्यावर तोडगा काढला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सचिव व माध्यम विभागाचे प्रमुख श्रीकांत शर्मा यांनी कटियार यांच्या वक्तव्यावर कुठलीही टिपणी करण्यास नकार देताना सांगितले की, अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मिती हा पक्षासाठी आस्था व वचनबद्धतेचा प्रश्न आहे.