शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

..तर देशाचे पुन्हा तुकडे होतील - जमीयत उलेमाचा इशारा

By admin | Updated: March 29, 2015 11:58 IST

घर वापसी व हिंदू राष्ट्राच्या नावाखाली तेढ पसरवणा-या कट्टरतावाद्यांवर लगाम लावला नाही तर देशाचे पुन्हा तुकडे पडतील असा इशाराच जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 
लखनौ, दि. २९ - घर वापसी व हिंदू राष्ट्राच्या नावाखाली तेढ पसरवणा-या कट्टरतावाद्यांवर लगाम लावला नाही तर देशाचे पुन्हा तुकडे पडतील असा इशारा जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने दिला आहे. देशातील जातीयवादी संघटना सुरक्षा यंत्रणांना हाताशी धरुन मु्स्लीम तरुणांविरोधात कट रचत आहे असा गंभीर आरोपही जमीयत उलेमाने केला आहे.  
शनिवारी लखनौत जमीयत उलेमाच्या कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाविरोधात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावात संघावर बाबरी मस्जिद पाडल्याचा आरोप लावण्यात आला असून संघावर बंदी घालावी अशी मागणीही संघटनेने केली आहे. भारत हा लोकशाही देश असून देशातील प्रत्येक व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य आहे. पण आता देशाला कायदा व न्यायाच्या मार्गावरुन अराजकतेच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा आरोपही यात करण्यात आला.  घर वापसी व हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ज्या संघटना तेढ पसरवत आहेत त्या संघटना स्वतःच्याच धर्माची चुकीची प्रतिमा निर्माण करत आहे असा चिमटाही उलेमाच्या प्रस्तावात काढण्यात आला आहे.
जमीयतचे अध्यक्ष मौलाना अर्शध मदानी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुसलमानांनी सर्वाधिक बलिदान केले आहेत. धर्माच्या आधारे देशाचे एकदा विभाजन झाले आहे. आता या सर्व प्रकारांवर लगाम लावला नाही तर देशाचे पुन्हा तुकडे होऊ शकतील. कट्टरतवादी संघटनांकडून तेढ पसरवण्याचे उद्योग सुरु असताना पंतप्रधान यावर संसदेत उत्तर देऊ शकले नाही अशी टीकाही मदानी यांनी नरेंद्र मोदींवर केली.