शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा शाळेतील संगणकांवर डल्ला ला.ना.शाळेत चोरी : पाच लाख रुपये किमतीचे साहित्य लांबविले

By admin | Updated: January 14, 2016 23:59 IST

जळगाव: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ला.ना.शाळेतील रायसोनी व आयसीटी या दोन्ही लॅबचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी त्यातील संगणक व त्याचे साहित्य असे पाच लाख रुपयांचे साहित्य लांबविल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. शाळेच्या मागील बाजुच्या तुटलेल्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश केला आहे.

जळगाव: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ला.ना.शाळेतील रायसोनी व आयसीटी या दोन्ही लॅबचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी त्यातील संगणक व त्याचे साहित्य असे पाच लाख रुपयांचे साहित्य लांबविल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. शाळेच्या मागील बाजुच्या तुटलेल्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश केला आहे.
गुरुवारी सकाळी सात वाजता लॅब असिस्टंट उमेश पिंगळे हे शाळेत आले असता एका लॅबची कडी उघडी दिसली तर दुसरीचा कडी कोंडा तुटलेला दिसला. कुलूप गायब झालेले होते. त्यांनी हा प्रकार लॅब प्रमुख सचिन देशपांडे यांना कळविला. त्यांनी लागलीच संस्थाध्यक्ष ॲड.सुशील अत्रे यांना हा प्रकार सांगितला. शाळेचे शिक्षक व संस्थेचे संचालक दाखल झाल्यानंतर पोलिसांना ही घटना कळविण्यात आली. पोलीस निरीक्षक शाम तरवाडकर, उपनिरीक्षक गिरधर निकम, गुन्हे शाखेचे राजू मेंढे, अल्ताफ पठाण आदीजण डॉगस्कॉड व फिंगर प्रिंट पथकासह दाखल झाले.स्थानिग गुन्हे शाखेचे पथक यावेळी दाखल झाले.
२१ क्रमांकाच्या खोलरतून प्रवेश
चोरट्यांनी बागील बाजूस उघड्या खिडकीतून शाळेत प्रवेश मिळविला. २१ क्रमांकाच्या खोलीतून त्यांनी लॅबमध्ये प्रवेश केला. संगणकासाठी लागणारे सर्व साहित्य चोरट्यांनी आणले होते.सीपीयु, हार्डडिस्क स्क्रु, खोलून आवश्यक तोच सामान नेण्यात आला आहे. दोन्ही लॅबमधील काही संगणक मात्र जैसे थे होते.एखाद्या माहितगार व्यक्तीकडूनच हा प्रकार झाल्याचा संशय शिक्षक व पोलिसांना आहे.

चाचणीचा डाटा झाला चोरी
फेब्रुवारी महिन्यात दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी होणार आहे. त्यासाठी लागणारा डाटा या संगणकात फिड करण्यात आला होता.ही चाचणी ऑनलाईन होणार होती. शिक्षकांनी त्याची तयारी केलेली होती, मात्र हा डाटाच चोरी झाल्याने मोठे संकट शिक्षकांवर येऊन ठेपले आहे. शाळेतील अन्य कोणत्याही वर्गात चोरट्यांनी प्रवेश केलेला नाही.
असे गेले साहित्य
रायसोनी लॅब
मॉनिटर्स-१९
कीबोर्ड-०९
माऊस-१७
सीपीयु केबल -१६
पॉवर केबल-१२
मॉनिटर स्टॅँड-१०
आयसीटी लॅब
मॉनिटर्स-०६
सीपीयु-०२
माऊस-०३
प्रिंटर्स ०१
रॅम-१३
मदरबोर्ड -०२
प्रोसेसर-०२
लॅन केबल -१ बंडल
हार्डीक्स-१०
सीडी रायटर-०५