मेडिकल स्टोर्समध्ये चोरी
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
नागपूर : मेडिकल स्टोर्सचे शटर तोडून चोरट्यांनी सौंदर्य प्रसाधने आणि एलसीडी चोरून नेला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
मेडिकल स्टोर्समध्ये चोरी
नागपूर : मेडिकल स्टोर्सचे शटर तोडून चोरट्यांनी सौंदर्य प्रसाधने आणि एलसीडी चोरून नेला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सागर प्रकाशराव तुंदलवार (वय ३५) यांचे नंदनवनमध्ये माँ अंबे मेडिकल स्टोर्स आहे. रविवारी रात्री ९.३० वाजता त्यांनी दुकान बंद केले. आज सकाळी ७.३० वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. तुंदलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. ----