शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची असहिष्णुतेवर कसोटी

By admin | Updated: November 30, 2015 01:07 IST

वाढत्या असहिष्णुतेच्या घटना आणि काही मंत्र्यांनी केलेल्या चिथावणीजनक विधानांबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधी सदस्यांनी दोन्ही सभागृहात असंख्य नोटिसा दिल्यामुळे हिवाळी

नवी दिल्ली : वाढत्या असहिष्णुतेच्या घटना आणि काही मंत्र्यांनी केलेल्या चिथावणीजनक विधानांबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी विरोधी सदस्यांनी दोन्ही सभागृहात असंख्य नोटिसा दिल्यामुळे हिवाळी अधिवेशनात आजपासून सरकारची कसोटी सुरू होत आहे. नियम २६७ अंतर्गत कामकाज निलंबित ठेवत चर्चा सुरू करावी अशी विनंती काँग्रेस आणि जेडीयूने राज्यसभेत दिलेल्या स्वतंत्र नोटीसमध्ये केली आहे. लोकसभेत काँग्रेस आणि माकपने नियम १९३ अंतर्गत चर्चेसाठी नोटीस दिली आहे. या नियमानुसार मतदान किंवा कामकाज निलंबित ठेवण्याची तरतूद नसली तरी चर्चा वादळी ठरणार असल्याचे संकेत मात्र दिले गेले. राज्यसभेत अद्याप संविधानावरील चर्चा अपूर्ण असल्यामुळे नंतर हा मुद्दा लावून धरला जाऊ शकतो. अधिवेशनाचे पहिले दोन दिवस घटनात्मक कटिबद्धतेवर चर्चा झाल्यामुळे विरोधकांनी ती न रोखण्याचा संयम पाळला. देशात असहिष्णुता वाढविणाऱ्या घटना घडत असताना मंत्र्यांनी चिथावणीजनक विधाने करीत त्यात तेल ओतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस, जेडीयू, माकप, भाकप आणि तृणमूल काँग्रेसने स्वतंत्र नोटीस देत चर्चेची मागणी केल्यामुळे सरकारवर खऱ्या संघर्षाला तोंड देण्याची पाळी येईल. काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी चर्चेसाठी नोटीस दिली असून ते भय आणि दहशतीच्या वातावरणासाठी छेडण्यात आलेली मोहीम, नामवंत लेखक आणि कलाकारांनी उचललेले पुरस्कारवापसीचे पाऊल यासारखे मुद्दे उपस्थित करतील. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्यांचा निषेध करणारा ठराव सभागृहाने पारित करावा अशी विनंतीही त्यांनी केली. जेडीयूचे नेते के.सी. त्यागी यांनी चिथावणीजनक विधाने करणाऱ्या पाच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (वृत्तसंस्था)