शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दादरीच्या सुडासाठी दहशतवाद्यांचा कट

By admin | Updated: October 16, 2015 04:13 IST

दादरी हत्याकांड आणि मैनपुरीतील जातीय तणावानंतर उत्तर प्रदेशातील दहशतवादी गट सक्रिय झाले असून राज्यातील काही शहरांमध्ये स्फोट घडविण्याची त्यांची योजना आहे.

नवी दिल्ली : दादरी हत्याकांड आणि मैनपुरीतील जातीय तणावानंतर उत्तर प्रदेशातील दहशतवादी गट सक्रिय झाले असून राज्यातील काही शहरांमध्ये स्फोट घडविण्याची त्यांची योजना आहे.इंटेलिजन्स ब्युरो आणि इतर गुप्तचर संस्थांनी उत्तर प्रदेश पोलिसांना याबाबत सतर्क केले आहे. दहशतवाद्यांचे काही संदेश गुप्तचर संस्थांनी टिपले असून त्यावरून दहशतवादी संघटनांच्या हल्ल्याच्या कटाचा खुलासा झाला आहे. या माहितीनंतर उत्तर प्रदेशात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया यांच्यासारखे हिंदुत्ववादी नेतेही दहशतवाद्यांचे लक्ष्य आहेत. सध्या राज्यात पंचायत निवडणुका सुरू असून उत्सवाचे दिवस आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेण्याचा विचार दहशतवादी करीत आहेत. गुप्तचरांच्या हाती लागलेल्या दोन व्यक्तींच्या संभाषणामध्ये राज्यातील स्लीपर सेलसंदर्भात माहितीची देवाणघेवाण केली आहे. त्यांच्या बोलण्यात अनेकदा अलाहाबादमधील एका व्यक्तीचा उल्लेख आला आहे. दहशतवादी गटातील पुरुषांच्या जाळ्यात अडकलेल्या काही महिला पोलीस अधिकारी या कारवायांमध्ये मदत करतील, अशीही ग्वाही हे दोघे देत असल्याचे यातून स्पष्ट होते. (वृत्तसंस्था)>काशी विश्वनाथ मंदिर आणि अयोध्येतील राम मंदिर परिसरात घातपाताचा धोका आहे. याशिवाय उत्तर प्रदेश विधानसभा, अलाहाबाद उच्च न्यायालय, कानपूर रेल्वेस्टेशन आणि अलाहाबाद लष्करी वसाहतीवर हल्ल्याचा कट रचण्यात येत आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरक्षा संस्थांनी याप्रकरणी अलाहाबादेतून दोन लोकांना अटक केली आहे.