शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी घेणार दादरीचा बदला - गुप्तचर यंत्रणेचा इशारा

By admin | Updated: October 15, 2015 10:32 IST

उत्तरप्रदेशमधील दादरी व मणिपुरी येथील हिंसेच्या घटनेनंतर दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय झाल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

आग्रा, दि. १५ - उत्तरप्रदेशमधील दादरी व मणिपुरी येथील हिंसेच्या घटनेनंतर दहशतवादी संघटना पुन्हा सक्रीय झाल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. या हिंसाचाराचा बदला घेण्यासाठी दहशतवादी संघटना विविध शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असून विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे दहशतवादी संघटनाच्या हिट लिस्टवर असल्याचे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. 

गुप्तचर यंत्रणेने उत्तरप्रदेश पोलिसांना पाच पानी अहवाल पाठवला असून या अहवालात उत्तरप्रदेशमधील दादरी व मणिपूरीतील हिंसाचारानंतर दहशतवादी संघटना सक्रीय झाल्याचे म्हटले आहे. दहशतवादी संघटना त्यांचे स्लीपर सेल्स पुन्हा सक्रीय करण्याचा प्रयत्न करत असून पंचायत समितीची निवडणूक व सणासुदीच्या काळात अडथळे निर्माण प्रयत्न या दहशतवाद्यांकडून केले जाऊ शकतात असे यात नमूद करण्यात आले आहे.  या अहवालानंतर उत्तरप्रदेशमधील पोलिस यंत्रणेला हायअलर्टचा इशारा देण्यात आली असून राज्यातील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.  
 
महिला पोलिसांसाठी हनी ट्रॅप 
गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या संभाषणात अलाहाबाद येथील एक व्यक्ती दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्यांना मदत करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महिला पोलिसांनी संघटनेतील पुरुषांनी हनी ट्रॅप केल्याने दहशतवादी कारवायात मदत होईल असा उल्लेख या संभाषणात करण्यात आला आहे.  गुप्तचर यंत्रणेने अलाहाबादमधून दोघा संशयितांना अटक केली असून या दोघांनी चौकशीत उत्तरप्रदेश विधानसभा, कानपूर स्टेशन, निवृत्त जवानांची निवासी वसाहत आदी ठिकाणी हल्ल्याचा कट होता अशी कबुली या दोघांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.