शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

इराण-सौदीदरम्यानचा तणाव चिघळला

By admin | Updated: January 5, 2016 00:33 IST

शिया धर्मगुरूला मृत्युदंड देण्यात आल्याने सौदी अरब आणि इराणदरम्यानचा तणाव विकोपाला पोहोचला असून सौदी अरब आणि मित्र देशांनी इराणसोबतचे संबंध तोडले आहेत.

रियाध : शिया धर्मगुरूला मृत्युदंड देण्यात आल्याने सौदी अरब आणि इराणदरम्यानचा तणाव विकोपाला पोहोचला असून सौदी अरब आणि मित्र देशांनी इराणसोबतचे संबंध तोडले आहेत. शनिवारपासून या दोन्ही देशांत शाब्दिक खडांजगीला सुरुवात झाली. सौदी अरबसोबत बहरीन आणि सुदाननेही आखात आणि अरब देशांमधील तेहरानच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तेहरानसोबतचे संबंध तोडले आहेत.तेहारानमधील सौदीच्या दूतावास जाळण्यात आल्याच्या प्रकाराने संतापलेल्या सौदीने रविवारी उशिरा इराणसोबतचे संबंध तोडत इराणच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना ४८ तासांच्या आत सौदी अरब सोडण्याचे फर्मान जारी केले. सोबतच इराणसोबतचा सर्व हवाई संपर्क तोडला आहे. सौदी अरबमधील सर्व विमान कंपन्यांना इराणकडे आणि इराणहून सौदीत येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द आणि रोखण्यास सांगण्यात आले आहे. बहरीन आणि सुदाननेही सोमवारी सौदीच्या पावलांवर पाऊल ठेवीत इराणशी संबंध तोडून टाकले. दरम्यान, सौदी अरब आणि इराण यांच्यातील पेच सोडविण्यासाठी रशियाने मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. सिरिया, येमेनसह मध्यपूर्वेतील (नैर्ऋत्य आशिया) संघर्षावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सौदी आणि इराणदरम्यान निर्माण झालेल्या पेचामुळे फसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देशांनी या दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. संयुक्त अरब अमिरातनेही राजदूत माघारी बोलावला आहे. अंतर्गत कारभारात तेहरान सातत्याने ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप सौदी अरबने केला आहे. अरबच्या बाबतीत इराणचा असाच आजवरचा इतिहास राहिला आहे, असे सौदीचे विदेशमंत्री आदेल अल-जुबेर यांनी म्हटले आहे. राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसह ८० सौदी नागरिकांनी इराण सोडले असून ते सोमवारी दुबईत दाखल झाले. सौदीच्या रणनीतीमुळे विभागीय तणाव चिघळेल, असे इराणने म्हटले आहे. इराणचा सौदीवर आरोपसंबंध संपुष्टात आणण्याच्या सौदीच्या निर्णयामुळे त्याने शिया मौलवींची हत्या करून केलेल्या घोडचुकीपासून जगाचे लक्ष विचलित होणार नाही, असे इराणने म्हटले. मौलवींना मृत्युदंड देण्याच्या सौदीच्या निर्णयामुळे प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊन दहशतवादाला चालना मिळेल, असेही इराणने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)> सौदी अरेबियात शिया मौलवी शेख निम्र अल निम्र्र यांच्यासह ४६ जणांना मृत्युदंड देण्यात आला. या घटनेने प्रदेशातील धार्मिक फूट पुन्हा उघड झाली आहे. बहरीनपासून पाकिस्तानपर्यंत हजारो शिया निदर्शक रस्त्यावर उतरले, तर सुन्नी राजवट असलेले देश सौदीच्या समर्थनार्थ पुढे आले. हा घटनाक्रम नवे राजे सलमान यांच्या नेतृत्वाखाली सौदी अरेबियाने आक्रमकता अंगीकारल्याचे अधोरेखित करतो. राजे सलमान यांच्या नेतृत्वाखालील सौदीने येमेनमधील शिया हुती बंडखोरांविरुद्धच्या आघाडीचे नेतृत्व केले, तसेच इराणने जागतिक सत्तांसोबत अणुकरार करूनही त्याचा तीव्र विरोध केला.