शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तापमान चाळीशीच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: March 13, 2016 00:03 IST

जळगाव- तापमान दिवसागणिक वाढत आहे. यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, शीतपेयांची मागणी वाढली आहे. दोनच दिवसात कमाल तापमान चार अंश सेल्सीअसने वाढून ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे.

जळगाव- तापमान दिवसागणिक वाढत आहे. यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, शीतपेयांची मागणी वाढली आहे. दोनच दिवसात कमाल तापमान चार अंश सेल्सीअसने वाढून ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे.
या आठवड्यात तापमानामध्ये सातत्याने वाढ झाली. जशी कमाल तापमानात वाढ झाली तशी किमान तापमानामध्येही वाढ झाली आहे. शनिवारी कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सीअस असल्याचे नोंद ममुराबाद योथील हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली आहे.

उकाडा आणि घामाच्या धारा
दिवसा प्रचंड उकाडा होतो. दुपारच्या वेळेस रस्त्यावरून वाहनाने किंवा पायी जाताना उन्हाचे चटके बसत आहे. घामाच्या धारा लागत असून, उन्हापासून संरक्षणासाठी बागायतदार रुमाल, गॉगल्स यांचा वापर वाढला आहे. आर्द्रता ५६ टक्के असल्याने उकाडाही जाणवू लागला आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी शीतपेयांची मागणीदेखील अलीकडे वाढली आहे. यामुळे शीतपेय विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

उसाचा रस व कोल्डड्रीक्सला मागणी
सध्या उसाच्या रसाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. तसेच विविध कंपन्यांतर्फे निर्मित कोल्डड्रीक्सनाही मागणी वाढली आहे. उसाच्या रसाला मागणी असल्याने फिरत्या रसवंत्या शहरात सुरू झाल्या आहेत.

कुलर, वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित
मागील काळात म्हणजेच या महिन्याच्या सुरुवातीला कुलर व वातानुकूलित यंत्रणांचा फारसा वापर होत नव्हता. परंतु या आठवड्यात जशी तापमानात वाढ होत गेली तसा कुलर व वातानुकूलित यंत्रणांचा वापरही वाढला आहे. किमान तापमान १७ अंश सेल्सीअस व आर्द्रता ५६ टक्क्यांपर्यंत असल्याने रात्रीही उकाडा होतो. बर्फ, थंड पाणी यांचा वापरही वाढल्याचे चित्र आहे.

दुपारनंतर ढगाळ वातावरण
शनिवारी दुपारी २.३० वाजेनंतर आकाशात ढग जमा झाले. वाराही सुटला. वार्‍याचा वेग काही काळ अधिक व नंतर कमी झाला. मध्येच ऊन पडत होते. सायंकाळपर्यंत हा ऊन सावलीचा खेळ सुरू होता. ढगाळ वातावरणामुळे मात्र उन्हापासून दुपारी काहीसा दिलासा मिळाला.

मागील काही दिवसांचे कमाल तापमान
(तापमान अंश सेल्सीअसमध्ये)
१० मार्च- ३६.६
११ मार्च ३७.६
१२ मार्च- ३९.२