शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक तीन तास ताटकळले अपंगत्वासंबंधी तपासणीला बोलावले : विद्यानिकेतनमध्ये झाले घामाघूम

By admin | Updated: May 11, 2016 22:15 IST

जळगाव : अपंगत्व, आजारपण याचे कारण देऊन बदली प्रक्रियेतून वगळलेल्या, विनंती बदलीस पात्र असलेल्या जिल्हाभरातील सुमारे ३०० शिक्षकांना बुधवारी शहरातील विद्यानिकेतन विद्यालयामध्ये जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बोलावले होते. सकाळपासून त्यासाठी शिक्षक आले, परंतु वेळेत ही कार्यवाही न झाल्याने ते सुमारे तीन तास ताटकळत बसून होते.

जळगाव : अपंगत्व, आजारपण याचे कारण देऊन बदली प्रक्रियेतून वगळलेल्या, विनंती बदलीस पात्र असलेल्या जिल्हाभरातील सुमारे ३०० शिक्षकांना बुधवारी शहरातील विद्यानिकेतन विद्यालयामध्ये जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाने बोलावले होते. सकाळपासून त्यासाठी शिक्षक आले, परंतु वेळेत ही कार्यवाही न झाल्याने ते सुमारे तीन तास ताटकळत बसून होते.

पाल्याचे अपंगत्व, स्वत:चे आजारपण, अपंगत्व आदी कारणांमुळे शिक्षकांनी विनंती बदली व बदली प्रक्रियेतून वगळण्याचे अर्ज केले आहेत. यासंदर्भात संबंधितांनी प्रमाणपत्र दिले आहेत. तशा नोंदी सेवा पुस्तिकेमध्येही आहेत. परंतु असे असताना संबंधित शिक्षक अपंग आहेत का, त्यांनी दिलेली कारणे खरी आहेत की खोटी याची शहानिशा करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे संबंधितांना विद्यानिकेतन विद्यालयात बोलावले होते.
सकाळी १० वाजता त्यासाठी शिक्षक या विद्यालयात आले. परंतु तपासणीसंबंधी कर्मचारीच आले नाहीत. यामुळे शिक्षक ताटकळत बसले होते. सुमारे तीन तास प्रतीक्षा करूनही त्यांची तपासणी झाली नाही.

ऐनवेळी १३ तारीख दिली
तपासणीसंबंधि शिक्षक वेळेत आले, पण आता येत्या १३ रोजी यासंबंधीची तपासणी होईल, असे कारण शिक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे ते पुन्हा माघारी फिरले. या चुकीच्या नियोजनाचा फटका शिक्षकांना बसला.