शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कर भरून जाहीर करा दडविलेली मालमत्ता !

By admin | Updated: March 1, 2016 03:54 IST

ज्या लोकांनी आजवर त्यांची संपत्ती, मालमत्ता अथवा रोखीच्या रूपाने असलेला पैसा जाहीर केलेला नाही, अशा लोकांसाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी

नवी दिल्ली : ज्या लोकांनी आजवर त्यांची संपत्ती, मालमत्ता अथवा रोखीच्या रूपाने असलेला पैसा जाहीर केलेला नाही, अशा लोकांसाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एका नव्या अभय योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत संबंधित व्यक्तीला त्याच्या दडविलेल्या संपत्तीवर ४५ टक्के कर भरून ती मालमत्ता नियमित करून घेता येईल. १ जून २०१६ ते ३० सप्टेंबर २०१६ या चार महिन्यांच्या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आपली संपत्ती जाहीर करणाऱ्या लोकांना दोन महिन्यांच्या आत कराची रक्कम भरून या योजनेअंतर्गत प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.या अंतर्गत ३० टक्के कर, त्यावर ७.५ टक्के अधिभार आणि त्यावरच साडे सात टक्के दंड अशी एकूण ४५ टक्के दराने आकारणी होणार आहे. यापैकी साडे सात टक्क्यांचा अधिभार हा ‘कृषी कल्याण अधिभार’ म्हणून घेतला जाणार असून, हा महसूल कृषी आणि ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देण्यास वापरण्यात येणार आहे. काळापैसा बाहेर काढण्यास सरकार कटिबद्ध असून, त्याकरिता ही योजना लागू केल्याचे जेटली म्हणाले.200%जर एखाद्या करदात्याने करचोरी किंवा करविषयक खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या दंडात आता घसघशीत वाढ झाली आहे. करचोरी करणाऱ्या व्यक्तीस ५० टक्के दंड तर कराची माहिती दडविणाऱ्या किंवा खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीवर तब्बल २०० टक्के दंड आकारण्यात येणार आहे. विविध भागातील कर अपिलीय प्राधिकरणामध्ये ३ लाख याचिका प्रलंबित असून, यामध्ये साडे पाच लाख कोटींचा निधी अडकला आहे. ज्यांचे अपील प्रलंबित आहे, अशा करदात्यांना वादात अडकलेली कराची रक्कम व सुनावणीच्या दिवसापर्यंत त्या रकमेवरील कर भरून तडजोडीने ती केस मिटविता येईल.