ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १ - सहकारी पत्रकार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले तहलका मासिकाचे माजी संपादक तरूण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने तेजपाल यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी मे महिन्यात तीन आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर जामीनाची मुदत १ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. अखेर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तेजपाल यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.
सहकारी पत्रकार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाअंतर्गत तेजपाल यांना गेल्यावर्षी गोव्यामध्ये अटक करण्यात आली होती.