शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा, महाराष्ट्र ‘इसिस’चे टार्गेट

By admin | Updated: January 24, 2016 12:01 IST

गोवा तसेच महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचा (इसिस) डाव होता आणि त्याची जबाबदारी निजामुद्दिन नामक इसिस हस्तकाला देण्यात

पणजी : गोवा तसेच महाराष्ट्रात घातपात घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरियाचा (इसिस) डाव होता आणि त्याची जबाबदारी निजामुद्दिन नामक इसिस हस्तकाला देण्यात आली होती. त्यासाठी दोन्ही राज्यांमधील गजबजलेल्या ठिकाणांची त्याने टेहळणी केली होती, अशी माहिती राष्ट्रीय तपासी यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत समोर आली आहे. निजामुद्दिनला शुक्रवारी उत्तर प्रदेश-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआएने त्याला ताब्यात घेतले. उत्तर गोव्यात मोठे अतिरेकी हल्ले घडवून आणण्याचे इसिसचे लक्ष्य होते, अशी माहिती त्याने निजामुद्दिनने चौकशी दरम्यान दिल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व तामीळनाडू या राज्यांमध्ये तो फिरला होता. इसिसचा गोव्यातील प्रमुख रिझवान याच्याशी निजामुद्दिन संपर्क साधून होता, अशी माहितीही त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी आणि देशी नागरिक गोव्यात येतात, हे ध्यानी घेऊनच इसिसने गोव्याला लक्ष्य ठरविले असावे, असा तपास यंत्रणेचा कयास आहे. (प्रतिनिधी)